पुणे : कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीत फिर्यादीमध्ये संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यासोबत दीड हजार आरोपींचा समावेश होता. परंतु आतापर्यंत याप्रकरणी शंभरच्या आसपास लोकांना अटक करण्यात आले आहे. संभाजी भिडेना वगळून ४० आरोपींविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली. पूर्वीच्या सरकारप्रमाणे महाआघाडीचे सरकारही या प्रकरणाची दखल घेत नाही. त्यांनी कोरेगाव भीमा प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन अशी रिपब्लिकन युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाचे पक्षनेता राहुल डंबाळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. सुवर्णा डंबाळे, आनंद रणधीर आदी यावेळी उपस्थित होते.
डंबाळे म्हणाले की, कोरेगाव भीमा प्रकरणात मुख्य संशयित आरोपी म्हणून संभाजी भिडे यांचा उल्लेख होत आहे. त्या अनुषंगाने २०१८ साली भिडे यांचा शोध घेण्यासाठी तपास अधिकारी यांनी आपली पथके सांगलीला पाठवली. परंतु मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली चौकशी होऊ शकली नाही. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने दाखल करावयाच्या चार्जशीटमधून संभाजी भिडे यांचे नावही वगळण्यात आले. आंबेडकरी जनता याचा तीव्र निषेध करत आहे.