पुणे : पव्हीलीयन मॉल मध्ये महिला दिनानिमित्त साडेतीनशे महिलांनी आपल्या पायांच्या ठशांनी भव्य चित्र साकारले. विविध क्षेत्रातील साडेतीनशे महिला एकत्र येऊन एका भल्या मोठ्या कॅनव्हास वर पायांच्या ठशांनी चित्र साकारत आहेत, हे दृश्य विलक्षण होते. सेनापती बापट मार्गावरील पव्हीलीयन मॉल मध्ये महिला दिनी पुण्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील ३५० महिलांनी हे सुंदर चित्र रंगवत समानतेचा संदेश दिला. या वर्षी महिला दिनाची संकल्पना हाेती , समानतेचा विचार करा, बदलासाठी नवीन विचार करा,स्मार्ट कृती करा,'. तोच संदेश या चित्रातून देण्यात आला.
वेगवेगळ्या क्षेत्रांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या तीस नामवंत महिलांनी आपल्या यशाचे रहस्य यावेळी उलगडले. महिलांच्या हक्कासाठी पुढे येण्याचे, प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. या वेळी या उपक्रमाचे आयोजक मॉल चे सेंटर डायरेक्टर राहील अजनी म्हणाले, जगाला घडविणारी शक्ती म्हणजे स्त्री आहे. त्या त्यांचे कुटुंब, मित्र परिवार , त्यांच्या आजूबाजूला असलेल्या सर्व माणसांची शक्ती असतात. आज वेगवेगळ्या क्षेत्रात आपले अस्तित्व, आपले अव्वल स्थान निर्माण करणाऱ्या स्त्रियांना मानाचा मुजरा. आज महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीचे दर्शन घडविणारा हा उपक्रम आयोजित करताना मला खूप आनंद आणि अभिमान वाटला. स्त्री शक्तीचा गौरव करण्याची ही प्रथा पव्हीलियान मॉल यापुढेही कायम ठेवेल.'