मेडद :
बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका लागल्याबरोबर गावातील पुढारी व उमेदवारांना आता मतदाराच्या आठवण येऊ लागली आहेत. ग्रामीण भागातील अनेक नागरिक पुणे-मुंबई सारख्या इतर शहराकडे रोजगार किंवा नोकरीसाठी गेलेले आहेत. ताई अक्का दादा वहिनी भाऊ तुम्ही गावाकडे कधी येणार आहे असे फोनवर संपर्क केला जात आहेत.
मतदानासाठी तुम्हाला गावाकडे यावेच लागेल असे आग्रहाचे निमंत्रण देखील दिले जात असल्याचे चित्र सध्या तरी ग्रामीण भागामध्ये पहावयास मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागल्यानंतर हे गावाकडे आलेले नागरिक पुन्हा नोकरीवर रोजगारासाठी शहरात गेले आहेत. त्यांना १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानासाठी गावाकडे कसे आणायचे याचे प्रयत्न उमेदवार व पुढारी ग्रामीण भागात करताना दिसता आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक उमेदवार असल्याने निवडणुका अटीतटीच्या होत असतात. त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला महत्त्व दिले जाते. त्यामुळे शहराकडे गेलेले नागरिकांना मतदानासाठी गावाकडे यावे यासाठी खूप प्रयत्न करताना उमेदवार दिसत आहेत. कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे अनेक दिवसापासून नोकरी रोजगार नसल्याने अनेक नागरिकांना झालेल्या मनस्तापाचा फटका देखील मतदारांकडून बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे असे मतदार मतदानासाठी येतील का हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. गाव पुढाºयांना ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेण्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन गावातील विकासाचे अनेक प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देत आहेत. रस्ता, बांधकाम, दिवाबत्ती, पाणीपुरवठा अशा अनेक योजनां सोडवून देण्यासाठी आपण कसे सक्षम आहोत. हे मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत.