आयुर्वेद हा प्राचीन वारसा : ज्येष्ठ महिलांचे मत
डमी 744
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या संकटाशी गेल्या एक वर्षापासून आपला सामना सुरू आहे. सध्या तरी कोरोनावर रामबाण उपाय असणारे औषध आपल्याकडे नाही. मात्र, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि कोरोनाच्या लक्षणांची तीव्रता कमी करण्यासाठी घरोघरी आजीबाईंच्या बटव्यातील उपायांचा अवलंब केला जात आहे. आयुर्वेद हा आपला प्राचीन वारसा असून, पूर्वीच्या काळी वैद्यकशास्त्र फारसे विकसित झाले नसताना अनेक आजारांवर घरगुती उपाय उपयुक्त ठरायचे. कोरोनाकाळातही घरगुती उपाय रामबाण ठरत असल्याचे मत ज्येष्ठ महिलांनी नोंदवले आहे.
शरीराची प्रतिकारशक्ती क्षीण असेल तर कोणत्याही विषाणुजन्य आजाराची लागण लवकर होते, हे आजवरच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. कोरोना काळातही प्रतिकारशक्ती कमी असलेल्या वर्गामध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप अशा लक्षणांची तीव्रता कमी करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या काळात आजीबाईचा बटवा कामी येत आहे. कोरोना होऊ नये म्हणून आणि झाल्यास त्याची तीव्रता कमी रहावी यासाठी वाफ घेणे, हळद-दूध घेणे, आयुर्वेदिक काढे पिणे, तुळशीची पाने खाणे, कोमट पाण्यात हळद आणि मीठ घालून गुळण्या असे उपाय बहुतांश घरांमध्ये जात आहेत.
-----
शहरातील कोरोनाचे एकूण रुग्ण -४,६४,९१६
कोरोनामुक्त झालेले रुग्ण - ४,४४,६१८
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण -१२३३०
एकूण कोरोना मृत्यू - ७९६८
-----
ज्येष्ठ मध, २ लवंगा भाजून त्याची पूड बनवून घ्यावी. दररोज सकाळी एक कप पाण्यात अर्धा चमचा पूड घालून पाणी उकळून अर्धा कप करून घ्यावे आणि
चहासारखे प्यावे. यामुळे घसा मोकळा राहतो. गव्हाचे दाणे घरातील कुंडीत पेरावेत. सहा-सात दिवसांनी कोंब फुटले की तो पाला मिक्सर मधून काढून, गाळून ते पाणी सकाळी उपाशीपोटी प्यावे. यामुळे प्रतिकारशक्ती वाढते.
- नलिनी रतन घोडके
-----------------------
१.तीळ किंवा नारळाचं तेल किंवा देशी तुपाचे दोन थेंब नाकपुड्यांमध्ये टाकावे
2.लेंडीपिंपळी, बदाम,दूध,दालचिनी,लवंग,गूळ,याचा लोखंडी भांड्यात केलेला काढा प्यावा.
3.रोज घरात कापूरदाणीमध्ये कापूर लावून ठेवावा. घरातील हवेत कायम त्याचा वास राहतो. अथवा कापराचा नुसता वास घेतला तरी ते गुणकारी ठरते.
- शुभांगी रमेश कुलकर्णी
---------
कोमट पाण्यात हळद आणि मीठ घालून सकाळी आणि संध्याकाळी गुळण्या केल्यास संसर्ग फुफ्सापर्यंत जात नाही. किमान दोन वेळा गरम पाण्याची वाफ घ्यावी. त्यात ओवा, ठेचलेले दोन-तीन लसूण आणि कापूर घालावा. चहामध्ये लवंग, दालचिनी आणि गवती चहाची पाने घालावीत.
- बलजीत कौर