इंदापूर शहरात असलेल्या माऊली बालक आश्रमात सध्या २६ मुले राहत आहेत. त्या बालकांचा शिमगा गोड करण्याचा माजी तहसीलदार जगन्नाथ मारुती जाधव ( वय ७६ ) व अलका जगन्नाथ जाधव ( वय ६९ ) यांनी निश्चय केला. ५१ वर्षांपूर्वी म्हणजे २४ मार्च १९७० रोजी विवाह झाला त्या दिवशी शिमगा ( होळी ) होता.
यंदा लग्नाचा वाढदिवस आणि शिमगा यामध्ये चार दिवसांचा फरक पडला. मात्र, जुन्या विचारांचे लोक सण-वार यांनाच प्रमाण मानत असल्याने, यंदा २८ मार्च ला शिमग्याच्या दिवशी लग्नाचा ५१ वा वाढदिवस इंदापूर येथील माऊली बालक आश्रमामध्ये साजरा केला.
मुलांना केक, समोसा, आईस्क्रीम, चॉकलेट वाटप करून मुलांचे तोंड गोड केले.
इंदापूर शहरातील रहिवासी जगन्नाथ जाधव यांनी महाराष्ट्र शासनात नायब तहसीलदार म्हणून ३८ वर्षे प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले. पुणे, इंदापूर, बारामती, दौंड येथे कर्तव्य बजावली आहे. वाढदिवसाचे निमित्त साधून जगन्नाथ जाधव यांचा मुलगा संतोष जाधव, मित्र परिवाराने आश्रमसाठी एक तेलाचा डबा, गहू व तांदूळ धनधान्य देऊ केले आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष जाधव, स्वप्निल शिंदे, सिद्धार्थ जाधव, बाळासाहेब क्षिरसागर, हर्षवर्धन कांबळे, विजय इंगोले, सोमनाथ तारगावकर, गणेश शहा , एकनाथ जाधव, धनाजी घोरपडे यांनी प्रयत्न केले तर चिमुकल्यांसोबत माधुरी भाट, धनराज भाट, कल्पना पवार, सागर जाधव, अबोली जाधव यांनी आनंद साजरा केला.
-ॉॉ
फोटो क्रमांक ज २९ इंदापूर चिमुकल्यांसह शिमगा
फोटो ओळ : इंदापूर येथे माऊली बालक आश्रमात वाढदिवस साजरा करताना माजी तहसीलदार जगन्नाथ मारुती जाधव व मान्यवर