शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
3
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
4
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
5
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
6
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
7
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
8
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
9
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
10
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
11
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
12
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
13
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
14
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
15
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
16
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
17
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
18
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
19
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
20
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

गुळुंचे गावठाण विस्ताराला मंजुरी

By admin | Published: June 01, 2017 1:34 AM

गावातील लोकसंख्येत होत असलेली वाढ, सार्वजनिक प्रयोजन, सार्वजनिक उपयोगिता तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजना

लोकमत न्यूज नेटवर्कनीरा : गावातील लोकसंख्येत होत असलेली वाढ, सार्वजनिक प्रयोजन, सार्वजनिक उपयोगिता तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजना राबविण्यासाठी गावठाणातील जागा अपुरी पडत असल्याने गुळुंचे येथे आज (ता. ३१) विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गावठाण विस्ताराला ग्रामसभेने एकमुखाने मंजुरी दिली.गावठाणाची निर्मिती झाल्यापासून आजतागायत गावात गावठाण विस्तार करण्यात आला नव्हता. त्यामुळे मोजणी झालेली जागा कुटुंबांना अपुरी पडत होती. अपुऱ्या जागेमुळे काही कुटुंबांनी गावठाणाशेजारील जागेत घरे बांधली. वास्तविक दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेनुसार वाढीव लोकसंख्या व गावठाण यांचा ताळमेळ घालणे आवश्यक होते. मात्र तसे न झाल्याने गावठाणाबाहेरील घरांना सोयी-सुविधा पुरविण्यात पंचायतीला अडचणी येत होत्या. केंद्र व राज्य शासनाच्या योजना राबविताना जागेची अडचण भासत असल्याने गावठाण विस्तार करणे गरजेचे होते. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गावातील ६५ लाभार्थ्यांची यादी यापूर्वी १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत बनविण्यात आली होती. परंतु यातील ११ जणांना स्वमालकीची जमीन नसल्याने घरकुल योजनेला घरघर लागली होती. येथील पशुवैद्यकीय दवाखाना बांधण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती, तसेच भविष्यकाळात उद्याने, व्यायामशाळा, क्रीडांगण, वाचनालय, सार्वजनिक शौचालय उभारण्यासाठी जागेची अनुपलब्धता होती. एकीकडे सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत प्राधान्य तत्त्वावर गावातील विविध विकासकामांना मंजुरी मिळत असताना जागा नसल्याने कामे बारगळण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन केल्याचे सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत स्थापन समित्यांचे समन्वयक सुरेश जगताप यांनी सांगितले.दरम्यान, गावठाण विस्तार करण्याकरिता आवश्यक जागेची पाहणी व त्याचा नकाशा तयार करण्यात आला होता. गुरुवारी (दि. २५) गावकामगार तलाठी, ग्रामसेवक यांनी पाहणी करून तयार केलेल्या नकाशाला ग्रामसभेत मंजुरी घेण्यात आली. गावातील गट क्र. २ ची हद्दनिश्चिती व्हावी, तसेच खुणा स्पष्ट व्हाव्यात, याकरिता या जागेचा मोजणी नकाशा तयार करण्याचा ठराव मंजूर झाला, तसेच जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन गावातील गावठाण क्षेत्राची मोजणी करण्यात यावी, असे ठरले. ऐनवेळच्या विषयात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अनेक जणांनी घरकुल मिळण्याची मागणी केली. यावर मागणी करणाऱ्या कुटुंबांची स्वतंत्र यादी करून मंजुरीसाठी गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे ठरले. ग्रामसेवक पुंडलिक म्हस्के यांनी विषयपत्रिकेचे व आलेल्या अर्जांचे वाचन केले. सभेसाठी महसूल विभागाकडूनगावकामगार तलाठी श्रीकांत अलोनी व कोतवाल नारायण भंडलकर, तसेच ग्रामपंचायत सदस्य दिलीप निगडे, भानुदास पाटोळे, निर्मला निगडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील लोकांना आताच राहण्यासाठी जागा कमी पडत असून भविष्यात अतिक्रमण वाढण्याची शक्यता आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना राबविणे अशक्य झाले आहे. त्यामुळे गावठाण विस्तार करण्यासाठी प्रयत्न केले. पुढील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन गावठाण विस्ताराकरिता मंजुरी घेण्यासाठी पत्रव्यवहार करणार आहोत.’’- रत्नमाला जगताप, सरपंच, गुळुंचे