सागम मिसाळ म्हणाले, संजय गांधी निराधार योजना (सर्वसाधारण) मधील २००० लाभार्थ्यांना ४१ लाख २ हजार ५०० रुपये, संजय गांधी निराधार योजना (अनुसूचीत जाती) मधील ४५९ लाभार्थ्यांना १० लाख २१ हजार ६०० रुपये, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (अनुसूचित जाती) ६९२ लाभार्थ्यांना १३ लाख ८४ हजार रुपये, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (सर्वसाधारण) ४३२० लाभार्थ्यांना ७७ लाख १४ हजार ४०० रुपये, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना २२६४ लाभार्थ्यांना ९ लाख ५ हजार ६०० रुपये, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना १० लाभार्थ्यांना ६ हजार रुपये, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना ८७ लाभार्थ्यांना ५२ हजार २०० रुपये यासह श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (सर्वसाधारण), मार्च २०२१ चे प्रलंबित अनुदान ३७ लाख ९२ हजार ४०० रुपये असे एकूण १ कोटी ८९ लाख ७८ हजार ७०० रुपये अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. मार्च २०२१ मध्ये राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे १५ लाभार्थ्यांना ३ लाख रुपये अनुदान ही त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे.
सध्या कोविडचा कसोटीचा काळ चालू आहे. लाभार्थ्यांच्या खात्यावर सरकारकडून मिळणारी आर्थिक लाभाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. ही रक्कम त्यांना मोठ्या कसोटीच्या काळात उपयोगी येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी कोविड १९ च्या नियमांचे पालन करून आवश्यकतेप्रमाणे बँक खात्यामधून रक्कम काढावी.
- अनिल ठोंबरे, तहसीलदार