इंदापूर : गेल्या पंधरा दिवसांतला पाऊस व येत्या आठवडाभरात पडणारा पाऊस यामुळे द्राक्षांवर केवडा व करपा रोगाचे आक्रमण होण्याची भीती व्यक्त होत आहे.राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने शिफारस केलेल्या बुरशीनाशकांचा तातडीने वापर झाल्यास या रोगांचा प्रतिबंध होईल. द्राक्षबागांचे नुकसान टाळता येईल, अशी माहिती येथील म. फुले कृषी विज्ञान केंद्राचे संचालक राजेंद्र वाघमोडे यांनी आज दिली. वाघमोडे म्हणाले की, आजघडीला द्राक्षबागांची आगाप फळछाटणी जवळ जवळ पन्नास टक्के पूर्ण झाली आहे. चालू तीन ते चार दिवसांत द्राक्षावर करपा रोग वाढण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)केवडा रोगाच्या नियंत्रणासाठी डायमिथोमॉर्फ अधिक मॅनकोझेब किंवा सायमॉक्सॅनिल अधिक मॅनकोझेब किंवा इप्रोव्हेलिकार्ब अधिक प्रोपीनेब किंवा मॅन्डीप्रोपामिड इत्यादी बुरशीनाशकाची फवारणी आलटून पालटून करावी. - राजेंद्र वाघमोडे, संचालक, म. फुले कृषी विज्ञान केंद्र
द्राक्षावर केवडा, करपा रोग ?
By admin | Published: October 02, 2016 5:32 AM