कोरोना सारख्या महामारीच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या व्यवसाय बंद पडले अनेकांच्या हाताला काम नाही. पठारवाडी येथील कातकरी कुटुंबांची परिस्थिती तर खूपच बिकट झाली आहे. विद्यार्थ्यांना अर्धपोटी, उपाशीपोटी राहून अथवा भिक्षा मागून शिक्षण घ्यावे लागत आहे. मुंबई माता बालसंगोपन संस्थेने त्यांची व्यथा जाणून पूरक आहार सुरू केल्याने या वंचित मुलांच्या मुखी घास भरणार आहे.
येत्या काही दिवसात शाळा सुरू होतील असे गृहीत धरून विद्यार्थ्यांना अध्ययनाची गोडी लागावी, शंभर टक्के उपस्थिती वाढावी आणि गळती रोखावी या उद्देशाने हा उपक्रम खेड तालुक्यातील जवळपास पन्नास शाळांमध्ये सुरू असल्याचे संस्थेचे संस्थापक डॉ. माधव साठे, समन्वय स्वाती शिंदे यांनी सांगितले. मुख्याध्यापक मनोहर मोहरे, शिक्षक किरण शिंगडे यांनी कोरोनाचे नियम पाळून विद्यार्थ्यांना पूरक आहार वाटपाची जबाबदारी घेतली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन अभ्यास देणार असल्याचेही सांगितले.
--------------------------------------------------------
फोटो क्रमांक : ०६चाकण आदिवासी खाऊ वाटप
फोटो - पठारवाडी शाळेतील आदिवासी कातकरी विद्यार्थ्यांना आहार वाटप.