नाटेकर यांच्या पार्थिवावर औंध येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाची माहिती कुटुंबीयांनी पत्रक प्रसिद्ध करून दिली. नाटेकर यांनी बॅडमिंटनमधील १५ वर्षांच्या कारकिर्दीत १०० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विजेतेपदे जिंकली होती. १२ मे १९३३ रोजी सांगली येथे जन्मलेल्या नंदकुमार नाटेकर यांनी भारताला बॅडमिंटनमध्ये अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले होते. बॅडमिंटनमध्ये भारताला परदेशात विजेतेपद मिळवून देणारे ते पहिले बॅडमिंटनपटू होते. त्यांनी १९५६ मध्ये क्वाललंपूर येथील सेलांगोर इंटरनॅशनल स्पर्धा जिंकून तेव्हा ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती. तसेच त्यांनी प्रत्येकी सहावेळा पुरुष एकेरी आणि दुहेरीचे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले होते. तसेच पाच वेळा मिश्र दुहेरीच्या विजेतेपद पटकावले होते. त्यात १७ राष्ट्रीय विजेतेपदांचा समावेश आहे.
बॅडमिंटनमधील ह्यगोल्डन बॉयह्ण
अफलातून कामगिरीसाठी नाटेकर यांना ह्यगोल्डन बॉय ऑफ इंडिया बॅडमिंटनह्ण अशी उपाधी देण्यात आली होती. ते स्पोर्ट्स अँड फिटनेस(एनएसएफ)चे संचालक होते. सांगलीत जन्म झालेल्या नाटेकरांचे मुंबईतील रामनारायण सूर्या महाविद्यालयात शिक्षण झाले होते.
---------------------------------------
प्रतिक्रिया -
जागतिक किर्तीचे बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांच्या निधनाने भारतीय क्रीडा क्षेत्रातील तेजस्वी तारा निखळला. १९५०-६० च्या काळात जागतिक बॅडमिंटनमध्ये त्यांनी भारताचे नाव ठळकपणे कोरले. त्यांची खेळाची शैली, चपळता आणि कौशल्य याद्वारे त्यांनी केवळ भारतातील नव्हे तर जागतिक स्पर्धाही सहजपणे जिंकल्या. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानामुळे अनेक खेळाडू घडले. नंदू नाटेकरांचा पुणेकरांना नेहमीच अभिमान वाटत राहील. बॅडमिंटन क्षेत्रात त्यांचे नाव अढळ राहील.
- अभय छाजेड, चेअरमन, महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटना
—————————————————-
नाटेकर हे जागतिक, आशियाई पातळीवरील अफलातून खेळाडू होते. आगळ्यावेगळ्या कौशल्याच्या जोरावर त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव मोठे केले. त्यांच्या खेळात नजाकत होती. त्यामुळे कोणत्याही स्पर्धेत त्यांचा विजय निश्चित असायचा. दुहेरीतही एकट्याच्या कामगिरीवर ते विजय मिळवायचे. बॅडमिंटनबाबत ते अतिशय शिस्तबद्ध होते त्यामुळेच विजयासाठी ते सर्वोत्तम कामगिरी करायचे. बॅडमिंटनबरोबरच संगीत क्षेत्राबाबत जिव्हाळा होता. पु. ल. देशपांडे, शांता शेळके, वसंत बापट, कुमार गंधर्व यांच्या कायर्यक्रमांसाठी ते आवर्जुन वेळ काढायचे. सांगलीत टेनिस खेळायला सुरूवात केल्यानंतर ते बॅडमिंटनमध्ये आले. त्यांच्यामुळेच भारतातील बॅडमिंटनला जागतिक ओळख मिळाली.
- उदय साने, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन पंच
———————————————————