शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; शुल्क कपातीचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 4:00 PM

ग्रंथालय, प्रयोगशाळा डिपॉजिट, कॉलेज मॅक्झीन,इंडस्ट्रीयल व्हिजिट शुल्क केले कमी

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शासन निर्देशानुसार संलग्न महाविद्यालयांच्या शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील सुमारे 650 महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून कोणते व किती शुल्क आकारावे व कोणते आकारू नये, याबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

कोरोनामुळे पुण्यासह राज्यभरातील महाविद्यालये सुमारे दीड वर्षांपासून पूर्णपणे बंद आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेणे शक्य होत नाही. त्यामुळे केवळ आॅनलाईन पध्दतीने शिक्षण दिले जात आहे. महाविद्यालयांकडून दिल्या जाणा-या विविध सुविधांचा लाभ विद्यार्थी घेत नसल्याने महाविद्यालयीन शुल्कात कपात करावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून केली जात होती. राज्य शासनाने शासकीय महाविद्यालयांच्या शुल्कात कताप करण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी झाली. परंतु, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांच्या शुल्काबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता.

शासन आदेशानुसार विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.सुधाकर जाधवर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती.डॉ.व्ही.बी.गायकवाड व डॉ.संजय चाकणे हे या समितीचे सदस्य होते.या समितीने दिलेल्या अहवालानंतर विद्यापीठाने शुल्क कपातीचा निर्णय जाहीर केला.------------------------------ विद्यापीठाने कोणत्या शुल्कात केली कपात शुल्काचा  प्रकार                             कमी केलेल्या शुल्काची टक्के लायब्ररी                                                     ५०लॉयब्रोटोरी                                                  ५०जिमखाना                                                   ५०स्टुडेंट वेलफेअर                                           ७५परीक्षा                                                        २५इंडस्ट्रीयल व्हिजिट                                    १००कॉलेज मॅक्झीन                                         १००डेव्हलपमेंट फंड                                         २५लॉयब्रोटोरी डिपॉजिट                                 १००इतर डिपॉजिट                                            १००हेल्थ चेकप                                                १००डिझास्टर मॅनेजमेंट                                   १००अश्वमेध                                                    १००कॉम्प्युटर सुविधा                                     ५०----------------------------शासनाने विद्यापीठांना शुल्क कपातीचे आदेश दिले होते. मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयाच्या धरतीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शुक्लात कपात केली आहे. ट्युशन शुल्कात कोणतीही कपात केलेली नाही.तसेच आॅक्टोबरपासून महाविद्यालये नियमितपणे आॅफलाईन पध्दतीने सुरू झाले तर  विद्यार्थ्यांकडून पूर्वी प्रमाणे उरर्वरित महिन्यांसाठीचे शुल्क नियमानुसार आकारता येणार आहेत. - सुधाकार जाधवर, सदस्य,व्यस्थापन परिषद ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ-----------------------------------विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या पुणे : ३८८अहमदनगर : १३१नाशिक : १५८ 

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीEducationशिक्षण