पौड : ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्याचा ठराव ग्रामस्थांनी ग्रामसभेत मंजूर केला आहे. त्यामुळे पौडगावाला (ता.मुळशी) आता नगरपंचायत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.या ग्रामसभेला सभापती उज्वला पिंगळे, सरपंच अनिता रोकडे, महेश पढेर, गणपत शेडगे, मयुर मखी, महेश कार्ले, संतोष पिंगळे, ज्योती उबाळे, ग्रामसेवक व्ही. टी. कदम, माजी सरपंच विनायक गुजर, प्रशांत पवार, छबन गुरव, नामदेव उबाळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मनोहर राऊत यांनी नगरपंचायतीचा दर्जा देण्याबाबत ठराव मांडला. संत उबाळे यांनी त्यास अनुमोदन दिले. तर के. के. पवार, दिलीप राऊत, रमेश पानसरे, अमित पिंगळे यांनी नगरपंचायतीमुळे होणारे फायदे स्पष्ट करून या ठरावास पाठींबा दिला. सभापती पिंगळे यांनी ग्रामपंचायतीला शुभेच्छा देवून नगरपंचायतीला पाठींबा दर्शविला. शासनाच्या नगर विकास खात्याकडून ग्रामपंचायतींना विकास निधी देताना अटी व शर्ती घातल्या जातात, परंतू या अटी व शर्ती नगरपंचायतींना लागू नसल्याचे पायाभूत सुविधांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या या निधीचा थेट फायदा पौड गावच्या विकासासाठी होणार आहे. (वार्ताहर)
पौड ग्रामस्थांचा नगरपंचायत निर्मितीला हिरवा कंदील
By admin | Published: June 13, 2014 5:22 AM