शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आमदार निवडून आणणार,सन्मानाने पक्षात प्रवेश करणार'; उमेश पाटलांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले
3
IPL Retention 2025 : KL राहुलने स्वत:च्याच पायावर मारली कुऱ्हाड? धोनी ठरला 'व्हॅल्यू फॉर मनी'!
4
डबल मर्डर केसमध्ये एकाला पकडलं; ७० हजारांसाठी अल्पवयीन मुलाने रचला भयंकर कट
5
Rashmi Shukla IPS: 22 व्या वर्षी बनल्या IPS, रश्मी शुक्लांचं किती झालंय शिक्षण?
6
IND vs NZ : वानखेडेवर मुंबईकरांची दिवाळी! चाहत्यांसाठी विराट कोहली थिरकला, VIDEO
7
फटाके फोडण्याच्या स्पर्धेतून लागली भीषण आग, ४ दुकानं खाक, कोट्यवधींचं नुकसान
8
काश्मीरमधील चिनाब ब्रिजवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी, पाकिस्तानबरोबर चीनही रचतोय कट
9
हीच ती वेळ? शिंदे गटातील नेते ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांची भेटीला; अचूक टायमिंगची चर्चा
10
IND vs NZ, 3rd Test : जड्डूचा 'पंजा' अन् वॉशिंग्टनचा 'चौका'; न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ धावांत आटोपला
11
शिवाजी महाराजांची मूर्ती पाहताच चिमुकली नतमस्तक, मराठी अभिनेत्रीच्या लेकीचं होतंय कौतुक; पाहा व्हिडिओ
12
Maharashtra Election 2024: गुलाबराव विरुद्ध गुलाबराव; मंत्री बनवणाऱ्या 'या' मतदारसंघात चुरशीची लढत
13
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
14
एकावर ३ फ्री शेअर देणार 'ही' कंपनी, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; २७००% वाढलाय भाव
15
“बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास
16
Singham Again Movie Review : रामायणाच्या पटलावरील अ‍ॅक्शन-कॉमेडीचा फसलेला डाव, जाणून घ्या कसा आहे सिनेमा?
17
WhatsApp ने आणलं कस्टम चॅट लिस्ट फीचर; युजर्सचा होणार मोठा फायदा, कसा करायचा वापर?
18
Gold Silver Price Review: सोन्यापेक्षा चांदीत अधिक तेजी; ऑक्टोबरमध्ये ₹४३६० महागलं गोल्ड, तर चांदी...
19
"...तोवर कायदा लागू केला जाऊ शकत नाही", UCC संदर्भात प्रशांत किशोर यांचा मोदी सरकारला सल्ला
20
आज मुहूर्त ट्रेडिंगवर खरेदी करा 'हे' 10 शेअर्स...तज्ज्ञांना दमदार परताव्याची आशा

ग्रीटिंग कार्ड्सच्या राहिल्या केवळ आठवणी, मागणी केवळ पाच टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 1:47 AM

पूर्वी दिवाळी म्हटल्याबरोबर फराळ, फटाके, नवीन कपडे या साºया गोष्टींबरोबरच आकर्षक रंगसंगतीतीले लहान-मोठ्या आकाराचे, अर्थपूर्ण मजकूर असणारे ग्रीटिंग कार्ड डोळ्यासमोर येते.

कोरेगाव मूळ : पूर्वी दिवाळी म्हटल्याबरोबर फराळ, फटाके, नवीन कपडे या साºया गोष्टींबरोबरच आकर्षक रंगसंगतीतीले लहान-मोठ्या आकाराचे, अर्थपूर्ण मजकूर असणारे ग्रीटिंग कार्ड डोळ्यासमोर येते. आपल्या जिवलगांनी, आप्तस्वकीयांनी पोस्टाद्वारे, कुरिअरद्वारे, स्वत: भेटून दिलेले ग्रीटिंग काडर््स वर्षानुवर्षे सांभाळून ठेवली जात.वारंवार ते काढून पाहिले जायचे, आठवणींना उजाळा दिला जायचा. सोशल मीडियाच्या जगात आता हे ग्रीटिंग कार्ड हद्दपार झाले असून, एकेकाळी ८०-९० टक्के असणारी ग्रीटिंग कार्डची मागणी केवळ पाच टक्क्यांवर आली आहे. ग्रीटिंग कार्ड देणाºयांनीच प्रमाण कमी केल्यामुळे आता ग्रीटिंग कार्ड बनविणारे, संदेश लिहिणारे (कॉपीरायटर), ग्रीटिंग कार्ड विकणारे या साºया साखळीवरच त्याचा परिणाम झाला असून, आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. ग्रीटिंग कार्डची विक्री करणा-या व्यावसायिकांना आता गिफ्ट आयटम्स ठेवून इतर पर्यांयाचा विचार करावा लागत आहे.पूर्वीच्या काळी दिवाळीच्या खर्चात ग्रीटिंग कार्ड्स खरेदी, पोस्टिंगचा खर्च याचे सेपरेट बजेट बाजूला काढून ठेवावे लागायचे. दिवाळीच्या एक-दोन दिवस आधी ग्रीटिंग कार्ड समोरच्याला मिळेल, असे नियोजन करून तिकीट लावून, व्यवस्थित पत्ता टाकून ग्रीटिंग पाठविले जायचे. मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना तर ग्रीटिंग कार्ड दिले जायचेच पण व्यावसायिक हितसंबंध दृढ करण्यासाठी विविध कार्यालये, कंपन्या, बॅँका, लहान-मोठ्या संस्था यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात ग्रीटिंग कार्डची देवाणघेवाण केली जायची.सोशल मीडियाचा विस्तार होण्याआधी व मोबाईल जगतात क्रांती झाल्यानंतर दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी लोक स्वस्तातल्या बल्क एसएमएसला प्राधान्य देत होते. आता हे एसएमएसही मागे पडत चालले असून व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आदी सोशल मीडियाने त्याची जागा घेतली आहे. एकेकाळी आपले वर्चस्व टिकवून ठेवणाºया ग्रीटिंग काडर््सना आता घरघर लागली आहे.विविध सामाजिक संस्था, बचतगट हेदेखील मोठ्या प्रमाणात ग्रीटिंग कार्ड बनवून विकत असायचे. त्या संस्थांना आर्थिक मदत करायची या पवित्र हेतूने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ग्रीटिंग कार्ड खरेदी केले जायचे. ग्रीटिंग कार्डमध्ये कल्पकता, पर्यावरणपूरक साहित्याचा वापर आदी विविध गोष्टींचा विचार केलेला असायचा. मात्र आता सोशल मीडियाद्वारे दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचे काम सुलभ, स्वस्त, बरेचदा तर विनामूल्य, जलद झाले असल्याने अबालवृद्धांनी पारंपरिक ग्रीटिंग कार्ड्सना बाय बाय करीत व्हॉट्सअ‍ॅप, एसएमएस, ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक, मेसेंजर यांना आपलेसे केले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड