या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, तहसीलदार विजयकुमार चोंभे, लोणीकंद पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, माजी सरपंच रुपेश शिवले, गणेश पुजारी, ज्ञानेश्वर शिवले, लोचन शिवले, सरपंच गुंफा इंगळे, उपसरपंच पवन खैरे आदी उपस्थिती होती. तर बहर्जी नाईक - भूमिका केलेले अजय तपकिरे हे कलाकार आले होते.
पुतळा परिसर स्थळाची आकर्षक सजावट मोहन शिवले यांनी केली होती. शंभूभक्तांनी आपापल्या घरी शंभू प्रतिमेला अभिवादन केले.
ध्येय मंत्र, स्मृती प्रेरणा गिते म्हणून सांगता केली.
लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी व सहकाऱ्र्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. सोशल मीडियावर ऑनलाईन पद्धतीने अभिवादनासाठी फेसबुक व यूट्यूब लाईव्हची व्यवस्था करण्यात आली होती थेट प्रेक्षपण होत होते, याचा लाखो भाविकांनी लाभ घेतला.
श्रीक्षेत्र तुळापूर (ता. हवेली) छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास आमदार अशोक पवार व सहायक आयुक्त किशोर जाधव यांनी पुष्पहार अर्पण केला.
आकर्षक फुलांची सजावट लक्ष वेधून घेत होती.
छत्रपती संभाजी महाराजांना पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.
छाया के. डी. गव्हाणे