पुणे: सजवलेले रथ, लेझीम, टाळ-मृदुंग आणि महिला ढोल पथक यासह फुले विचारांचे फलक असलेले नागरिक आणि फुले दाम्पत्यांचा जयजयकार अशा उत्साहाच्या वातावरणात माळी महासंघातर्फे आयोजित भव्य रॅलीव्दारे फुले दांपत्याला अभिवादन करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. मुलींच्या शिक्षणासाठीची ही ज्ञानज्योत आज देशाला प्रगती पथावर नेत आहे. दरवर्षी प्रमाणे १ जानेवारी हा दिवस यंदा देखील फुले दांपत्य सन्मान दिवस म्हणून साजरा करण्यात आला.या रॅलीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून माळी समाजातील बंधू-भगिनी, समविचारी व्यक्ती, कार्यकर्ते आणि फुले विचार प्रचारक - प्रसारक सहभागी झाले होते. यावेळी माळी महासंघाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे, अखिल भारतीय माळी महसंघाचे अध्यक्ष गोविंद डाके, महात्मा फुले वसतिगृहाचे अध्यक्ष दीपक जगताप, समाज प्रमुख जगन्नाथ लडकत, समाज प्रमुख राजाभाऊ रायकर, काळुराम उर्फ अण्णा गायकवाड, शहर संयोजक अश्विन गिरमे, पश्चिम महाराष्ट्राचे संयोजक अतुल क्षीरसागर, जिल्हा संयोजक चंद्रशेखर दरवडे, प्रवीण बनसोडे, अनिल साळुंखे, महात्मा फुले मंडळाचे पिंपरी-चिंचवड प्रमुख हनुमंत माळी, रेखाताई रासकर, राखी रासकर, शारदा लडकत, संतोषअण्णा लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. सजवलेले रथ, लेझीम, टाळ-मृदुंग आणि महिला ढोल पथक यासह फुले विचारांचे फलक असलेले नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. भिडे वाडा येथून या भव्य रॅलीचा प्रारंभ होऊन ती पुढे दगडूशेठ गणपती मंदिर, शिवाजी रस्ता, मंडई चौक, फडगेट पोलीस चौक, पानघटी चौक, गंजपेठ पोलीस चौकी चौक मार्गे महाराणा प्रताप रस्त्याकडून येऊन फुले वाडा येथे या रॅलीचा समारोप झाला. यावेळी यावेळी माळी महसंघाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ..............
पुण्यात भव्य रॅलीव्दारे फुले दांपत्याला अभिवादन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2019 2:00 PM
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.
ठळक मुद्देमहाराष्ट्रातील हजारो फुले विचार समर्थकांचा सहभाग ; माळी महासंघातर्फे आयोजन