प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमांचे पूजन मंडळाचे मानद सचिव वैभव शेठ तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांची गिते गाऊन अभिवादन केले. या नंतर वक्तत्व व निबंध स्पर्धा झाल्या.
कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थ्यिनी अनुराधा घोलप हिने "होय मी सावित्री बोलतेय" हा एकपात्री प्रयोग सादर केला. वकृत्व स्पर्धेत कमल धोत्रे व निबंध स्पर्धेत जोस्ना माळी यांनी प्रथम क्रमांक मिळविले.
या अभिवादन कार्यक्रमासाठी मंडळाचे मानदसचिव वैभवशेठ तांबे प्राचार्य बशीर शेख प्रा. सुरेखा गोरडे प्रा. संभाजी शिंदे हांडे एस. बी. तुकाराम हजारे आदी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले विद्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करताना उपस्थित प्राध्यापक.