पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सासवड येथील वाघीरे महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुषमा भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भारतरत्न ङॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोविङ 19 चे नियमांचे पालन करून साजरी करण्यात आली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय, समता, बंधुता यासह सामान्य नागरिक हाच राज्यघटनेचा केंद्रबिंदू मानला. राज्यघटनेने सामाजिक,आर्थिक, राजकीय न्याय मिळाला पाहिजे यासाठी सर्वाना समान संधी बहाल केली आहे. असे मत प्राचार्य डॉ. सुषमा भोसले यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बाळासाहेब काळे, प्रा. संजय लांडगे, एम. जी. जगताप, व्यवसाय अभ्यासक्रम विभाग प्रमुख प्रा. सुनीता भगवान, प्रा.शेख आर.एस. कल्पना कुचेकर कार्यालयातील सेवक नितीन शिवरकर उपस्थितीत होते.
सासवड येथील वाघिरे महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर याना अभिवादन करणेत आले