पुणे : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यामध्ये लॉकडाऊन परिस्थितीत लागु करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना काही अडचण आल्यास यासाठी जिल्ह्यात खास तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आले आहेत.जिल्हयातील इतर सर्व तक्रारींसाठी नियंत्रण कक्ष सुरु असून , त्याचा नंबर 020- 26123371 /1077 टोल फ्री नंबर आहे. (नियंत्रण कक्ष 24 7 कार्यरत आहे. ) त्यावर कोरोनाच्या अनुषंगाने सर्व तक्रारी स्वीकारल्या जातात. त्यासाठी उपजिल्हाधिकारी सुनिल गाडे यांची स्वतंत्र समन्वयक अधिकारी नेमणुक करण्यात आली आहे.लॉकडाऊन परिस्थितीमुळे उदयोग व्यवसाय प्रभावित झाल्यामुळे कामगार विस्थापित / बेरोजगार व परराज्यातील अडकलेले कामगार या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी कामगारांच्या तक्रारींबाबत स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सदर कक्षाचे फोन नंबर 020- 26111061 व मोबाईल नंबर 7517768603 असा असून या नंबरवरती कामगारांच्या तक्रारी स्वीकारणार आहेत. सदर तक्रारींबाबत उपजिल्हाधिकारी सुभाष बागडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तर जेष्ठ नागरीक व दिव्यांगासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष (020- 29706611) स्थापन करण्यात आला असून या नियंत्रण कक्षात सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत संपर्क करुन आपली तक्रार देऊ शकतात. त्यासाठी सहा.आयुक्त विजय गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कोरोना विषाणुच्या अनुषंगाने जिल्हयातील नागरीकांना तसेच कामगार, मजुर व इतर कुठल्याही तक्रारीसाठी सदर नियंत्रण कक्षाकडे तक्रार देण्यात यावी व सदर तक्रारीचे तात्काळ निवारण व अंमलबजावणी सदर नियंत्रण कक्षामार्फत करण्यात येईल असे स्पष्ट केले.
लॉकडाऊन परिस्थितीमध्ये ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी तक्रार निवारण कक्ष सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 11:58 AM
लॉक डाऊन केल्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना शारीरिक ,मानसिक, आर्थिक यांसारख्या अनेक समस्यांना सामोरे लागत आहे.
ठळक मुद्देतक्रारीचे तात्काळ निवारण व अंमलबजावणी सदर नियंत्रण कक्षामार्फत करण्यात येईल