लोकमत न्यूज नेटवर्क
घोडेगाव : कोरोनामुळे गेल्या दिड वर्षांत मोठ्या प्रमाणात पोलिस ठाण्यात नागरीकांचे तक्रार अर्ज प्रलंबीत राहिले आहेत. या तक्रारींचे निवारण होण्यासाठी तक्रार निवारण दिन सुरू करण्यात आला आहे. येत्या काळात कोरोना नियमांचे पालन करत संपुर्ण जिल्ह्यात तक्रार निवारण दिन घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.
घोडेगाव येथे पोलिस ठाण्याला भेट देत डॉ. देशमुख यांनी स्वत: लोकांच्या तक्रारी समजून घेतल्या. तसेच त्यांचे जागेवरच निरसरन केले. जमिनींचे वाद, किरकोळ भांडणे, हरवल्याच्या तक्रारी, ग्रामपंचायतचे वाद अशा स्वरूपाच्या तक्रारी त्यांनी स्वत: सोडवल्या. यावेळी घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, पोलिस उपनिरीक्षक किशोर वागज, माजी सभापती कैलासबुवा काळे, जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, सरपंच क्रांती गाढवे, महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा रत्ना गाडे, अॅउ. संजय आर्वीकर, अॅड. गायत्री काळे, अॅड.वैभव काळे, स्वप्ना काळे, सखाराम पाटील काळे, मधुआप्पा बोऱ्हाडे, दिलीप बोऱ्हाडे, सुनिल इंदोरे, गणेश कसबे उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले, तक्रार निवारण दिनात तपासी अधिकारी, प्रभारी अधिकारी सगळेच एका ठिकाणी भेटतात. त्यामुळे एखाद्या तक्रारीची चर्चा होवून अंतिम निर्णय घेता येतो. त्यामुळे लोकांचे हेलपाटे वाचतात व प्रकरणांचा लवकर निपटारा होतो. या पुढे दर पंधरा दिवसाला तक्रार निवारण दिन घेण्याचा प्रयत्न असणार आहे. यावेळी डॉ. देशमुख यांनी पोलीस ठाण्याची पाहणी केली. सर्व विभागाला त्यांनी भेट देऊन त्याठिकाणी सुरू असलेले काम पाहिले व पोलिसांना सुचना केल्या.
चौकट
तक्रार निवारण दिनी ६६ तक्रारींचा निपटारा
डॉ. अभिनव देशमुख यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात घेतलेल्या तक्रार निवारण दिनात ६६ तक्रार अर्ज आले होते. यातील ४५ मिसींग केस पैकी ६ जणांचा तपास लागला. तर २५ मृत व्यक्तिंचा निर्णय झाला. गाडी, मोबाईल असे जमा असलेले ६ मुद्देमाल संबंधितांना परत करण्यात आले.
09092021-ॅँङ्म-ि02 झ्र घोडेगाव येथील पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिनाप्रसंगी लोकांच्या अडचणी समजून घेताना जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख व सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने.
------
09092021-ॅँङ्म-ि03 घोडेगाव येथील पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिनाप्रसंगी पोलिस ठाण्यात कामानिमीत्त आलेल्या लोकांच्या अडचणी समजून घेताना जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख व सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने.