शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

पुण्यात '' ही '' सव्वाशे मैदाने राजकीय सभांसाठी होणार उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 8:41 PM

लोकसभा निवडणूकीच्या प्रचारसभा, मेळावे आणि कोपरासभा घेण्यासाठी उमेदवारांसह कार्यकर्त्यांपुढे जागांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमहापालिकेने यंदा लोकसभा निवडणुकांसाठी तब्बल १३० मैदानांची केली यादी या जागांमध्ये सर्वात छोटे मैदान बालेवाडी येथील २५० चौरस मीटरचेपालिकेच्या मालकीच्या जागा सभेसाठी देताना रेडीरेकरनरच्या दरानुसार भाडे आकारणी

पुणे : निवडणुकांच्या काळामध्ये राजकीय सभांसाठी मैदाने उपलब्ध होण्यामध्ये विविध पक्षांसमोर अडचणी उभ्या राहात असून नेमक्या कुठे सभा घ्यायच्या असा प्रश्न निर्माण होतो. महापालिकेने यंदा लोकसभा निवडणुकांसाठी तब्बल १३० मैदानांची यादी केली असून यामध्ये शहराच्या मध्यवस्तीसह उपनगरांचा समावेश आहे. लोकसभा निवडणूकीच्या प्रचारसभा, मेळावे आणि कोपरासभा घेण्यासाठी उमेदवारांसह कार्यकर्त्यांपुढे जागांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणुकांच्या काळात यावरुन प्रशासन आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवतात. त्यामुळे महापालिकेने राजकीय प्रचारसभांसह मेळावे आणि कोपरा सभांसाठी तब्बल १३० जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने उपनगरांमधील जागांचा समावेश आहे. मात्र, शहराच्या मध्यवस्तीतील शिवाजीनगर आणि सदाशिव पेठ वगळता अन्य कोणत्याही भागाचा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. उपलब्ध करुन देण्यात आलेल्या जागा पालिकेच्या ताब्यात आलेल्या आहेत. या जागांमध्ये सर्वात छोटे मैदान बालेवाडी येथील २५० चौरस मीटरचे आहे. तर सर्वात मोठे मैदान खराडी येथील असून त्याचे क्षेत्रफळ २४ हजार ३९६ चौरस मीटरचे आहे. त्यामुळे या मैदानांवर काही हजारांच्याच सभा होऊ शकतील. मोठ्या नेत्यांच्या भव्य सभा घेण्यासाठी आणखी मोठ्या मैदानाची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे. अशा वेळी विविध शिक्षण संस्था आणि महाविद्यालयांच्या मैदानांचा विचार होऊ शकतो. पालिकेच्या मालकीच्या जागा सभेसाठी देताना रेडीरेकरनरच्या दरानुसार भाडे आकारणी केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. पालिकेने जी मैदाने उपलब्ध करुन दिलेली आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पालिकेच्या शाळांच्या मैदानांचा समावेश आहे. यासोबतच अ‍ॅमेनिटी स्पेस तसेच वेगवेगळया आरक्षणापोटी पालिकेच्या ताब्यात आलेल्या रिकाम्या जागांचा समावेश आहे. या सर्व जागा पालिकेच्या जागा वाटप नियमावली २००९ नुसारच भाडे तत्वावर देण्यात येणार असल्याचे भूसंपादन विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. ==जागानिहाय आकडेवारी==

भाग            एकूण उपलब्ध जागा

आंबेगाव बु         - 11        बावधन खु        - 03        बालेवाडी                   - 11        बाणेर            - 07        धायरी            - 06        हडपसर            - 24        कोंढवा बु                  - 12        खराडी            - 01        महंमदवाडी        - 01        पाषण            - 06        वडगाव शेरी        - 01        वारजे            - 04येरवडा                   - 01        कात्रज            - 02बालेवाडी                  - 27        धनकवडी                  - 01कोंढवा खु                  - 01        खराडी            - 01शिवाजीनगर        - 02        सदाशिव पेठ        - 01औंध            - 01        वडगाव बु                   - 06एकूण            - 130

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक