सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बारामती : कोरोना संकट आणि त्यानंतर आलेली टाळेबंदी यामुळे शेती व्यवसाय पूर्णतः अस्थिर झाला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला बाजारात उठाव मिळत नाही. व्यापारी आणि विक्रेते मात्र मनमर्जीप्रमाणे तरकारीचे दर लावून ग्राहकांना विकतात. त्यामुळे पिकवणारा उपाशी, तर दलाल तुपाशी असे चित्र सध्या आहे.
कोरोना संक्रमण कमी झाल्यानंतर डिसेंबर-जानेवारी मध्ये कोबी आणि फ्लॉवरची एक एकर क्षेत्रावर लागवड केली. मात्र माल बाजारात जाण्याची वेळ येताच पुन्हा कोरोना रुग्णवाढ होऊ लागल्याने हॉटेल व्यवसायावर बंधने येऊ लागली. परिणामी १६० किलो माल पाठवला तरी हातात केवळ १०० रुपये आले. त्यामुळे पीक सोडून द्यावे लागले. आज उभ्या पिकामध्ये जनावरे बांधली आहेत, अशी व्यथा काशिनाथ भोसले या तरुण शेतकऱ्याने मांडली.
--
खर्च पंचवीस हजार, उत्पन्न १०० रूपडे
काशिनाथ भोसले या शेतकऱ्याला २५ हजारांच्या भांडवली खर्चानंतर केवळ शंभर रुपये हातात मिळाले, हा वाईट अनुभव सांगताना भोसले म्हणाले की, कोबी आणि फ्लॉवरचे पीक लावणीपासून ते काढणीपर्यंत एकरी २५ हजाराचा खर्च झाला. पीक देखील चांगले आले. उन्हाळ्यात पर्यटन वाढल्याने हॉटेल, रेस्टॉरंट, चायनीज सेंटर अशाठिकाणी कोबी आणि फ्लॉवरला चांगली मागणी असते. मात्र मार्च महिन्यापासून कोरोना रुग्णसंख्य वाढू लागल्याने सर्वत्र बंधने आली. शासनाने देखील निर्बंध आणले. परिणामी पुणे येथील बाजार समितीमध्ये अवघ्या १ रुपया किलोने कोबी गेला. फ्लॉवरची देखील तीच परिस्थिती. लासुर्णे येथून पुण्याला मी ४० किलोच्या चार गोण्या माल पाठवला. एका गोणीचे ८० रुपये झाले. त्यामध्ये प्रत्येक गोणीचे भाडे ५० रुपये आणि इतर खर्च ५ रुपये. त्यामुळे एका गोणीमागे केवळ २५ रुपये राहिले. १६० किलो मालाचे मला केवळ १०० रुपये मिळाले. त्यामुळे पुन्हा बाजारात माल पाठवला नाही. पीक सोडून दिले. २५ हजार खर्च करून केवळ १०० रुपये हाती लागले.
--------------------------------
फोटो क्रमांक- १५बारामती पिकविणारा उपाशी
फोटो ओळी : भोसले यांनी सोडून दिलेले कोबीचे पीक. व शेतात चरत असलेली जनावरे
----------------------------