केडगाव : केडगाव (ता दौंड) परिसरातील गुऱ्हाळांनी प्रदूषणपातळी ओलांडली आहे. परप्रांतीय कामगार व ठेकेदार यांनी ताब्यात घेतलेला हा व्यवसाय दिवसेंदिवस प्रदूषण पातळीमुळे धोकादायक बनला आहे. पूर्वी गुऱ्हाळाला जळण म्हणून वाळलेले पाचट, चोतरी वापरली जायची. परप्रांतीय जळण म्हणून प्लॅस्टिक, चपला, बूट, टाकाऊ वस्तुंचा वापर केला जातो. कार्बनडाय आॅक्साईड, कार्बन मोनॉक्साईड यासारख्या विषारी वायुंची यातून निर्मिती होते. साखर कारखान्यापेक्षाही जास्त प्रदूषण या गुऱ्हाळांतून झालेले दिसते.दौंडच्या पश्चिम पट्ट्यामध्ये ४०० पेक्षाही अधिक गुऱ्हाळे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यापैकी १ गुऱ्हाळ अधिकृत आहे. अलीकडील काळामध्ये या व्यवसायात गुन्हेगारी वाढली आहे. संबंधित प्रशासनाने गुऱ्हाळ प्रदूषण रोखावे, अशी मागणी केडगाव परिसरात जोर धरत आहे.
गुऱ्हाळांमुळे प्रदूषणात वाढ
By admin | Published: December 13, 2015 11:55 PM