शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

जीएसटी सहायक आयुक्तांना ३० हजार रुपयांची लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 3:56 AM

नियमाप्रमाणे व्हॅट भरला असतानाही तक्रारदारांच्या असेसमेंट आॅर्डरविरुद्ध अपिलामध्ये न जाण्यासाठी जीएसटी कार्यालयातील सहायक आयुक्त प्रसाद पुरुषोत्तम पाटील (वय ४८, रा़ प्रसादनगर, वडगाव शेरी) यांना ३० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.

पुणे : नियमाप्रमाणे व्हॅट भरला असतानाही तक्रारदारांच्या असेसमेंट आॅर्डरविरुद्ध अपिलामध्ये न जाण्यासाठी जीएसटी कार्यालयातील सहायक आयुक्त प्रसाद पुरुषोत्तम पाटील (वय ४८, रा़ प्रसादनगर, वडगाव शेरी) यांना ३० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.याबाबतची माहिती अशी : तक्रारदार हे काँट्रॅक्टर आहेत़ त्यांनी २०१३ मध्ये वानवडी येथे महापालिकेचे एक बांधकामाचे काम घेतले होते़ त्या वेळी सिव्हिल वर्क कामावर ५ टक्के व्हॅट होता़ त्याप्रमाणे हा कर तक्रारदारांनी भरलेला होता़ पंरतु, सहायक आयुक्त प्रसाद पाटील यांनी तुम्ही भरलेला टॅक्स कमी भरला आहे़ तो ८ टक्केप्रमाणे भरायचा आहे़ त्याप्रमाणे तक्रारदार यांनी असेसमेंटची मागणी केली़ त्या वेळी पाटील यांनी तुम्हाला जरी अपील करायचे असेल तर त्यासाठी अगोदर उरलेला व्हॅट व दंड असे १७ लाख रुपये भरावे लागतील, असे सांगितले़ जर यातून तुम्हाला मार्ग काढायचा असेल तर ४५ हजार रुपये द्यावे लागतील, अशी लाचेची मागणी केली.३० हजारांची लाच घेताना कारवाईतक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २० मार्च रोजी तक्रार केली़ त्यानुसार त्याची पडताळणी करण्यात आली़ तेव्हा तडजोड म्हणून त्यांनी ३० हजार रुपये घेण्याचे मान्य केले़ त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी येरवडा येथील जीएसटी कार्यालयात सापळा रंचला़ तक्रारदारांकडून त्यांना तेथील कँटीनमध्ये ३० हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले़ पोलीस निरीक्षक राजू चव्हाण, एस़ एस़ घार्गे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली़ पाटील यांच्या वडगाव शेरी येथील घरामध्ये तपास सुरू आहे़

टॅग्स :Arrestअटक