निगडी : देशभरात येत्या १ एप्रिलपासून वस्तू व सेवाकर (जीएसटी) या कायद्याची अंमलबजावणी होत आहे. जीएसटीमुळे सर्व क्षेत्रांतील २ ते ५ टक्के दर कमी होणार आहे. त्यामुळे उद्योगधंदे वाढीस लागतील. जनतेला स्वस्तात उत्पादन मिळाल्याने आर्थिक विकास दर वाढण्यास मदत होईल. त्यामुळे उद्योजक व व्यावसायिकांनी करप्रणाली ३१ मार्चपूर्वी जीएसटीमध्ये रूपांतर करून घ्यावी. जेणेकरून जीएसटीच्या सवलतीचा फायदा घेता येईल, असे आवाहन केंद्रीय उत्पादन व सेवाकर विभागाचे आयुक्त एन. श्रीधर यांनी केले.निगडी येथील दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट आॅफ इंडिया (आयसीएआय) पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने जीएसटी या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आयसीएआयच्या अप्रत्यक्ष कर समितीचे अध्यक्ष सीए मधुकर हिरेगंगे, विक्रीकर विभागाचे उपायुक्त राजेश आडवानी, केंद्रीय उत्पादन व सेवाकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त शिवकुमार, सहायक आयुक्त सार्थक सक्सेना, सह आयुक्त पवनकुमार, आयसीएआय पिंपरी चिंचवड शाखेचे माजी अध्यक्ष सुहास गार्डी, बबन डांगले, प्रसाद सराफ, सुनील कारभारी, शाखाध्यक्ष सीए रवींद्र नेर्लीकर, उपाध्यक्ष व खजिनदार आमोद भाटे, सचिव युवराज तावरे, विद्यार्थी संघटन अध्यक्षा प्राजक्ता चिंचोलकर, संतोष संचेती आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘जीएसटी’चा अंगिकार करावा
By admin | Published: March 21, 2017 5:16 AM