शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
2
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
3
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
4
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
5
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
6
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
7
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
8
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
9
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
10
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
11
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
12
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
13
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
14
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
15
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
16
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
17
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
18
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
19
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
20
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान

पालकमंत्री अजित पवार राजीनामा द्या; पुण्यात शरदचंद्र पवार पक्षाचे निषेध आंदोलन

By निलेश राऊत | Published: June 25, 2024 3:10 PM

पुणे शहरात अंमली पदार्थांचा सुळसुळाट झाला असून, गृहखात्याला याचा थांगपत्ता नाही ही बाब संशयाला वाव देणारी, आंदोलकांचा आरोप

पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात अंमली पदार्थांचा सुळसुळाट झाला असून,  गृहखात्याला याचा थांगपत्ता नाही ही बाब संशयाला वाव देणारी आहे. असा आरोप करीत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने मंगळवारी राज्य सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री अजित पवार राजीनामा द्या अशा घोषणाही देण्यात आल्या. 

 ज्ञानेश्वर पादुका चौक, फर्ग्युसन कॉलेज रस्ता येथे पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जगताप यांनी,  शहरात छोट्या मोठ्या हॉटेल्स, बारमध्ये खुलेआम अमली पदार्थ मिळतात, शहरात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढतच असून भर दिवसा हातात कोयता घेऊन हिंडणारे गुंड अनेक ठिकाणी दिसत आहेत. मात्र कायद्याचा धाक गुन्हेगारांना राहिलेला नाही. ड्रग्स माफियांना, गुन्हेगारांना अधिकाऱ्यांचे, मंत्र्यांचे अभय आहे ही बाब सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी मात्र केवळ लोकसभा निवडणुकीच्या चिंतनात, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आणि विधानसभेच्या जागा वाटपात व्यस्त असल्याचे ते म्हणाले.      दरम्यान राज्य सरकारकडून येत्या काही दिवसात ठोस उपाययोजना न झाल्यास शहरात एकच वेळी अनेक ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनाय उदय महाले, राजीव साने, दिलशाद शेख, किशोर कांबळे, अजिंक्य पालकर, स्वप्निल जोशी, जयदीप देवकुळे, राजश्री पाटील, पोपट खेडेकर, स्वाती चिटणीस, सुषमा सातपुते, सुनील पडवळ, नितीन कदम, वंदना मोडक, गणेश नलावडे, स्वाती पोकळे, काका चव्हाण उपस्थित होते. आंदोलनात पालकमंत्री उत्तर द्या, गृहमंत्री उत्तर द्या, ५० खोके एकदम ओके, ५० खोके कोयता गँग ओके, ५० खोके ड्रग माफिया ओके, गृहमंत्री राजीनामा द्या, उत्पादन शुल्क मंत्री राजीनामा द्या, मोदींसाठी मुरलीधर पुण्याची सुरक्षा वाऱ्यावर अशा घोषणा देण्यात आल्या.

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारagitationआंदोलनAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारण