महापौरांची सूचना पालकमंत्र्यांकडून मंजूर, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 04:23 PM2021-03-12T16:23:24+5:302021-03-12T18:01:36+5:30
स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासिकाबाबत मोठा निर्णय
पुणे: मुख्यमंत्र्यांनी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य पाहता २१ मार्चला परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिकाना परवानगी द्यावी अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यावर सकारात्मक प्रतिसाद सूचना मान्य करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत कोरोना परिस्थितीच्या आढाव्याची बैठक पार पडली. त्यावेळी महापौरांकडून हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दोन दिवसांपूर्वी संचारबंदी होणार नाही. पण कडक निर्बंध लागू होतील. असे स्पष्ट संकेत दिले होते. अजित पवार यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत निर्बंध लागू होतील. असेही सांगितले होते.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी स्पर्धा परिक्षेवर तोडगा काढून परीक्षा २१ मार्चला होणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आले होते. आमचा मुलांना पाठिंबा आहे. त्यांच्याबद्दल सरकार सकारात्मक विचारच करत असल्याचे सांगितले. त्या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिकाना विद्यार्थ्यांच्या पन्नास टक्के क्षमतेत परवानगी देण्यात आली आहे.