महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथील कृषिदूत सिद्धांत यांनी बुरशी व खोड रोग नियंत्रण संबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. बुरशी रोग व खोड रोगांवरील प्रभावी नियंत्रणासाठी बोर्डो पेस्ट व मिश्रण वापरली जाते. कळीचा चुना दगडरहित असावा, मिश्रण करताना धातूच्या भांड्याचा वापर करू नये, फवारणी होईपर्यंत प्लॅस्टिक ड्रममध्ये मिश्रण करावे, क्षारयुक्त पाणी वापरू नये, जर बोर्डो पेस्ट केलेली असेल तर ती जमिनीपासून १.५- २ फूट खोडाला वर लावावी, अशा सूचना त्यांनी केल्या. या वेळी मळदमधील प्रगतिशील शेतकरी प्रशांत शेंडे व अन्य शेतकरी उपस्थित होते.
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, समन्वयक डॉ. डी .पी. कोरटकर, प्राचार्य आर. जी. नलवडे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. एकतपुरे, प्रा. डी. एस. मिटकरी , प्रा. एस. आर. आडत यांचे मार्गदर्शन लाभले.
मळद येथे बोर्डो पेस्टबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
१६०९२०२१-बारामती-०२