काळूस येथील रुपेश वसंत आरगडे यांच्या भूमी अॅग्रो बायोफूड्स या मका जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोठे यांनी प्रकल्पाला भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. रासायनिक खतांची बचत, माझी शेती शाळा व विविध विषयावर शेतकऱ्यांशी संवाद साधला. तालुक्यातील काळूस येथील भूमी अॅग्रो शेतीमालावर प्रक्रिया करणारा व शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ करून देणारा प्रकल्प म्हणून पाहिले जाते. प्रकल्प पाहून अरगडे यांचे कौतुक केले. या वेळी खेड उपविभागीय कृषी अधिकारी ढगे तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे, पंचायत समिती उपसभापती ज्योती अरगडे, सुवर्णा पठारे, अनिल अरगडे, गोरख टेमगिरे, भरत आरगडे, संदीप पोटवडे, श्रीकांत पोतवडे, बबन पवळे, बाळू खैरे, संतोष खलाटे, किरण अरगडे, माऊली पोटवडे, परशुराम खैरे, चक्रधर पोटवडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना सुभाष पवळे यांनी केली तर कार्यक्रमाचे आयोजन कृषी सहायक माने अश्विनी यांनी केले आणि भिवाजी जाचक यांनी आभार मानले.
काळूस येथे कृषी संजीवनी सप्ताहनिमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ज्ञानेश्वर बोठे.