पौड : मुळशी तालुक्यात पोलीस चौकीसमोरच तडीपार गुंडाचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. दुचाकीवरून जात असलेल्या सुशांत ऊर्फ पप्पू लक्ष्मण सातपुते (वय २८, रा. अकोले, ता. मुळशी) याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. कोळवण पोलीस चौकीसमोर ही घटना रात्री ८ च्या सुमारास घडली.पौड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पप्पू सातपुते कोळवण गावाकडून काशिग येथे चालला होता. या वेळी त्याच्यावर हल्ला करण्यात आला. या वेळी पप्पूसोबत असलेला साथीदार रवींद्र सातपुते या हल्ल्यात जखमी झाला आहे.पप्पू आणि रवींद्र दोघे दुचाकीवर बसून कोळवण गावाहून काशिगच्या दिशेने निघाले होते. त्या वेळी वाळेण फाट्याच्या पुढे पोलीस चौकीसमोरच तीन अज्ञातांनी त्यांची गाडी अडविली. गाडी थांबल्याबरोबर त्यांनी पप्पूच्या तोंडावर धारदार शस्त्राने वार करण्यास सुरुवात केली. जीव वाचविण्यासाठी पप्पू आणि रवींद्र दोघेही रस्त्याने पळत सुटले. परंतु मारेकºयांनी पप्पूच्या चेहºयावर सपासप वार करून त्याला जागीच ठार मारले. या झटापटीत रवींद्रही जखमी झाला. पप्पू ठार झाल्याचे दिसताच मारेकरी पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सहायक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे घटनास्थळी दाखल झाले.
गुंड पप्पू सातपुतेचा पोलीस चौकीसमोर खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 2:15 AM