गराडे : गुरोळी (ता.पुरंदर) गावाचे नाव अंजिराचा गाव म्हणून एकेकाळी दिल्लीपर्यंत पोहोचले होते. पण सातत्याने दुष्काळी परिस्थितीमुळे येथील बऱ्याच बागा शेतकऱ्यांनी तोडल्या. पण आता शेतीसाठी पाणी हवे म्हणून गाव एक झाला. सरपंच रामचंद्र खेडेकर यांचे ५ लाख रुपये तसेच गावाचे ३७ लाख असे एकूण ४२ लाख रुपयांची वर्गणी गावाने जमविल्यानंतर गावाच्या लोकसहभागातून येथील पुरंदर उपसा जलसिंन याजनेच्या दिवे वितरेकेमधून ८००० फूट पाईप उपलाईन टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले. यामुळे गुरोळी गावाचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. गुरोळी (ता. पुरंदर) येथे ग्रामस्थांच्या खर्चातून पुरंदर उपसाच्या पाईपलाईनची चाचणी करण्यात आली. पुरंदर उपसाच्या पाईपमधून पाणी बाहेर येताच ‘नाथ साहेबाचं चांगभलं’चा एकच जयघोष करीत फटाक्यांची आतषबाजी करीत ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. या वेळी गावातील २०० ते ३०० लोक तसेच शाळेतील विद्यार्थी व शिक्षकही उपस्थित होते. पाण्याचे पूजन सरपंच रामचंद्र खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी, साहेबराव भोसले, लक्ष्मण शिंगाडे, अमोल बंड, गोरख खेडेकर, बापूसाहेब खेडेकर, राजाराम खेडेकर, सुभाष खेडेकर, विलास जगताप, मधुकर खेडेकर, आनंद खेडेकर, विठ्ठलराव खेडेकर, काळुराम लवांडे, नानासाहेब कुंजीर, सुरेश खेडेकर, संपत खेडेकर, संतोष खेडेकर, रविंद्र खेडेकर, कैलास जाधव, तानाजी खेडेकर, हनुमंत खेडेकर आदी उपस्थित होते.(वार्ताहर)
गुरोळीचा पाणीप्रश्न मार्गी
By admin | Published: February 06, 2016 1:39 AM