लोकमत न्यूज नेटवर्कवाकड : दापोडी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील सण १९८८ च्या कला शाखेचे माजी विद्यार्थी तब्बल २१ वर्षांनंतर आपल्या मित्र मैत्रिणींना आणि आपल्या लाडक्या गुरूंना भेटले आणि हे केवळ शक्य झाले ते व्हॉट्सअॅप वरील ग्रुपमुळे.या बॅचचा नुकताच स्नेहमेळावा साजरा झाला. या निमित्ताने त्यांना शिकविणारे गुरुवर्य प्राध्यापक आसाराम गोरे सरांची भेट विद्यार्थ्यांना घेता आली. २१ वर्षांनंतर प्रत्येकात बदल झालेले काहींना तर ओळखणे अशक्य, मात्र प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात पाय घट्ट रोवून स्थिर स्थावर झालेले. मग या भेटीचा आणि आपल्या चांगुलपणाचा समाजाला काय फायदा असा सूर येथे निघाला. ज्या समाजात आपण वाढतो त्याच्या ऋणांची परत फेड म्हणून यापुढे समाजपयोगी उपक्रम या ग्रुपच्या माध्यमातून राबविण्याचा संकल्प केला. १९८८ ला महाविद्यालयाचे आदर्श शिक्षक असलेले आणि सध्या राहुरी येथील कला, शास्त्र, वाणिज्य महाविद्यालयात कर्तव्यावर असणारे प्राध्यापक गोरे हे या मेळाव्याला आवर्जून उपस्थित होते. २१ वर्षांनी संकटांवर मात करून असे एकत्र येत समाजासाठी मोठे योगदान द्या, असे आवाहन प्राध्यापक गोरे यांनी केले. सतीश फुगे, किशोर राजेशिर्के, विजय लांडे, सुभाष कांबळे यांच्यासह विद्यार्थ्यांनी शोध घेतला.
गुरू-शिष्याची २१ वर्षांनी भेट
By admin | Published: May 26, 2017 6:08 AM