नवीन शैक्षणिक वर्ष सुरू : दुर्गम भागात मोबाइलला रेंज मिळेना; शिक्षणात अडथळा
पुणे : गेल्या शैक्षणिक वर्षात शाळा बंद होत्या. तरीही शिक्षकांना शाळेत येणे बंधनकारक होते. कोरोना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून यंदाही विद्यार्थ्यांना ऑनलाइनच शिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी शाळेत शिक्षकांची उपस्थिती ५० टक्के अनिवार्य करण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक वर्ष नुकतेच सुरू झाले आहे. त्यामुळे पुन्हा ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. तर काही तालुक्यांतील दुर्गम भागात मोबाईल रेंजमुळे समस्या येत असल्याने प्रत्यक्ष गावात, वाड्यावस्त्यांवर जाऊन विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षण देण्यासाठी शिक्षक स्वतःहून पुढाकार घेत असल्याचे विधायक चित्र पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यातील काही तालुक्यांतील अनेक गावे दुर्गम, आदिवासी पट्ट्यात आहेत. तेथील पालकांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे मोबाइल नाहीत. तसेच या भागात मोबाईलला रेंज मिळत नाही. त्यामुळे भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील गावात, वाड्यावस्त्यांवर प्रत्यक्ष जाऊन ओसरीवर सामाजिक अंतर राखत विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करत आहेत. काही व्हिडीओ तयार करुन लॅपटॉपच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रयत्न शिक्षक करत आहेत. ऑनलाइन शिक्षणाचा निर्णय जरी असला तरी अनेक शिक्षक ऑफलाइन शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे सकारात्मक चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
------
पॉईंटर्स
* जिल्ह्यातील एकूण प्राथमिक शाळा :- ३६५२
* जिल्ह्यातील एकूण प्राथमिक शिक्षक :- ११,५००
* जिल्ह्यातील एकूण माध्यमिक शाळा :- १९३२
* जिल्ह्यातील एकूण माध्यमिक शिक्षक :- ३०,०५८
------
कोट
प्राथमिक शिक्षणाधिकारी
राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने ऑनलाइन शिक्षण देण्याचा निर्णय यंदाही घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत शिक्षकांची उपस्थिती ५० टक्के अनिवार्य करण्यात आली आहे.
- स्मिता गौड, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, पुणे
---------
कोट
माध्यमिक शिक्षणाधिकारी
मंगळवारी पहिला दिवस असल्याने शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती होती. बुधवारपासून पहिली ते नववीपर्यंतच्या शिक्षकांची उपस्थिती ५० टक्के तर पुढील इयत्ताच्या शिक्षकांची उपस्थिती शंभर टक्के ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
- सुनंदा ठुबे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, पुणे
-------
शिक्षक काय म्हणतात...
१) ऑनलाइन शिक्षणावर पूर्णतः विसंबून न राहता आम्ही ऑफलाइन देखील शिक्षण देत आहोत. कारण माझी शाळा आदिवासी दुर्गम पट्ट्यात आहे. येथील अनेक पालकांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही. त्यामुळे गावात, वाड्यांवर प्रत्यक्ष जाऊन ओसरीवर विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक अंतर ठेवत शिकवत आहे. ऑनलाइन शिक्षण देण्यास मर्यादा येत असल्याने झेरॉक्स काढून देतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होत आहे.
- बाबासाहेब काळे, शिक्षक, गिरेवडी, लोहगड, मावळ
------
दुर्गम भाग असल्याने गावात मोबाइलला रेंज मिळत नाही. त्यामुळे मुलांना एकत्र पण कोरोनामुळे सामाजिक अंतर ठेवत शिकवत आहे. एका संस्थेने लॅपटॉप दिला आहे. त्यावर व्हिडीओ तयार करून त्यातून शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- मल्लिकार्जुन कांबळे, करंजगाव पठारे, मावळ
--------
तालुकानिहाय उपस्थिती (ग्राफ)
तालुका प्राथमिक माध्यमिक
भोर ५० टक्के ५० टक्के
वेल्हा ५० टक्के ५० टक्के
मावळ ५० टक्के ५० टक्के
मुळशी ५० टक्के ५० टक्के
पुरंदर ५० टक्के ५० टक्के
हवेली ५० टक्के ५० टक्के
शिरूर ५० टक्के ५० टक्के
खेड ५० टक्के ५० टक्के
आंबेगाव ५० टक्के ५० टक्के
जुन्नर ५० टक्के ५० टक्के
दौंड ५० टक्के ५० टक्के
बारामती ५० टक्के ५० टक्के
इंदापूर ५० टक्के ५० टक्के