शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

गुरूनाथ नाईक यांना पहिली रहस्यकथा पुण्यातच सुचली, जुन्या आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2021 7:47 PM

गूढ शैली आणि रंजकता या वैशिष्टांमुळे त्यांच्या कादंब-यांनी मराठी वाचकांना अक्षरश: खिळवून ठेवले

पुणे : आपल्या रहस्यकथांनी अवघ्या महाराष्ट्राला झपाटून टाकणारे आणि तब्बल बाराशे कादंब-या लिहून रहस्यकथेच्या प्रांतात अढळ स्थान निर्माण करणारे "रहस्यकथा"कार गुरूनाथ विष्णू नाईक (वय 84) यांचे बुधवारी पुण्यात निधन झाले. 

गुरूनाथ नाईक यांना पहिली रहस्यकथा ही पुण्यातच सुचली. १९७० साली कामानिमित्त पुण्यात आले असताना एका प्रकाशकाने त्यांना दोन रहस्यकथा लिहून देण्याची विनंती केली आणि क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी होकार दिला. यादरम्यान ते पुण्यातील अलका चित्रपटगृहात 'किस द गर्ल्स अँन्ड मेक देम डाय' हा इंग्रजी चित्रपट पहायला गेले. डोक्यात कथा लिहून देण्याचे विचार सुरू होते. अचानक चित्रपट अर्धवट सोडून ते उठले आणि थेट रूमवरगेले. रात्री दोन वाजेपर्यंत जागून त्यांनी  ‘मृत्यूकडे नेणारे चुंबन' ही पहिली रहस्यकथा लिहून काढली.

त्यानंतर ‘शास्त्रज्ञाच्या मृत्यूचे गूढ’ ही दुसरी कथा त्यांनी लिहिली. प्रकाशकाकडून त्यांच्या कथा लेखनाला हिरवा कंदिल मिळाला आणि गुरुनाथ नाईक यांचा रहस्य कथाप्रांतात उदय झाला. १९७० ते १९८२ या काळात त्यांनी ७२४ रहस्य व गूढकथा लिहिल्या. यात सैनिकी जीवनावरील २५० शिलेदार कादंब-या आहेत. गोलंदाज ही काल्पनिक व्यक्तिरेखा साकारून त्याच्या भोवती १५० कथा लिहिल्या. त्यांच्या कादंब-यांनी अल्पावधीतच लोकप्रियता मिळविली. पुणे आकाशवाणी केंद्रासाठी त्यांनी काही सांगीतिका आणि श्रृतिकाही लिहिल्या.

गूढ शैली आणि रंजकता या वैशिष्टांमुळे त्यांच्या कादंब-यांनी मराठी वाचकांना अक्षरश: खिळवून ठेवले. आपल्या घराण्याचे ’नाईक’ हे मूळ आडनाव वापरून तसेच ‘हेमचंद्र साखळकर’ हे नाव परिधान करून त्यांनी विपुल लेखन केले. ’कॅप्टन दीपच्या ’’शिलेदार’ कथा, मेजर अविनाश भोसलेच्या ‘गरुड’ कथा, उदयसिंह राठोडच्या, ‘गोलंदाज’कथा, सूरजच्या  ‘शब्दवेधी’ कथा, रजनी काटकरच्या   ‘रातराणी’ कथा, जीवन सावरकरच्या   ‘सागर’ कथा आणि बहिर्जी नाईकच्या ‘बहिर्जी’ कथा, अशा एकाहून एक सरस पात्रांच्या सुरस आणि मनोवेधक रहस्यकथा लिहून त्यांनी साहित्य विश्वात स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. बाबूराव अर्नाळकरांच्या कादंब-यांचाही विक्रम नाईक यांनी मोडला.

नाईक यांची  ‘अजिंक्य योद्धा’, ’अंधा कानून’, ’अंधाराचा बळी’, ’अफलातून’, ’आसुरी,  ‘कायदा’,  ‘कैदी नं. १००’, ’गरुडभरारी’, ’गोलंदाज’, ’झुंज एक वा-याशी’,  ‘तिसरा डोळा’, ’दिल्लीचा ठग’, ’देहान्त’, ’रणकंदन’, ‘रणझुंज’,  ‘सरळ चालणारा खेकडा’, ’सवाई’, सुरक्षा’,  ‘हर हर महादेव’ अशी अनेक पुस्तके लोकप्रिय ठरली आहेत. ’स्वर्ग आणि नर्क’ ही त्यांची शेवटची कादंबरी ठरली.

टॅग्स :PuneपुणेartकलाcinemaसिनेमाSocialसामाजिक