प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ओमकार उच्चार करत शिक्षकांना कुंकूम तिलक व चरणावर पुष्प अर्पण करून गोड पेढा, खडीसाखर भरवत वंदन करत उपस्थित गुरुजानांचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी संस्थेचे सचिव अजित वडगावकर, मुख्याध्यापक प्रदीप काळे, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, शिक्षक प्रतिनिधी अल्लाबक्ष मुलाणी आदी उपस्थित होते.
दरम्यान, सचिव अजित वडगावकर यांनी आपल्या परिपूर्ण जीवनासाठी गुरूंचे योगदान किती महत्त्वाचे असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले.
विद्यार्थी मनोगतात संस्कृती चव्हाण हिने आदर्श जीवन जाण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद मोलाचे असल्याचे सांगितले. विद्यालयातील संस्कृत विषयाचे अध्यापक विजय हुले यांनी गुरुकुल अध्यापन व अध्ययन यांची माहिती सांगत गुरू परंपरेचे दाखले दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप काळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रमोद कुलकर्णी तर आभार संजय उदमले यांनी मानले.
२४आळंदी
आळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षकांचे पूजन करताना विद्यार्थी.