याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत पवार, पोलीस हवालदार रमेश भोसले, पोलीस नाईक रणजित मुळीक हे बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील शिर्सुफळ येथे गस्त घालत असताना यावेळी पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना इसम नामे सोमनाथ धोडींबा गोडसे हा शिर्सुफळ येथे बेकायदा गुटख्याची विक्री करत असल्याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार तेथे जाऊन छापा टाकला. घटनास्थळावरील १लाख ३८ हजार ६२८ रुपयांचा विविध प्रकारचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. गुटखा विक्रीप्रकरणी सोमनाथ धोंडीबा गोडसे (वय ४३, वर्षे रा.शिर्सुफळ, महादेव मळा ता. बारामती, मूळ रा. सौधणी ता.मोहोळ जि. सोलापूर ) याला अटक करण्यात आली.
ही कारवाई कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहायक पोलीस फौजदार शशिकांत पवार, पोलीस हवालदार रमेश भोसले, पोलीस नाईक रणजित मुळीक यांनी केली आहे.
---
फोटो क्रमांक : ०९ सांगवी गुटखा विक्री
फोटो ओळी : गुटखा जप्त करताना पोलीस अधिकारी, कर्मचारी.