शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

गुटखा विक्री नियमांची होतेय सर्रास पायमल्ली

By admin | Published: May 03, 2017 2:21 AM

महाराष्ट्रात गुटखाविक्री बंदीचा नियम शासनाने लागू केला असला, तरी रावेत, आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर, वाल्हेकरवाडी परिसरासह शहरात

 रावेत : महाराष्ट्रात गुटखाविक्री बंदीचा नियम शासनाने लागू केला असला, तरी रावेत, आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर, वाल्हेकरवाडी परिसरासह शहरात सर्वत्र खुलेपणाने गुटखाविक्री सुरू आहे. ठरावीक लोकांना हप्ते द्या आणि दुकाने, पानाच्या टप-या वा अन्य कोठेही बिनधास्तपणे गुटखाविक्री करा, असा अलिखित फतवाच हप्तेखोरांनी काढला असल्याची परिस्थिती आहे. कर्करोगासारख्या घातक रोगांचे मूळ असलेली तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन करू नका असे, आवाहन शासनाच्या आरोग्य विभागाकडून दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून सातत्याने केले जात आहे. महाराष्ट्रात गुटखा, तसेच पानमसाल्याचे उत्पादन, वितरण, साठा व विक्री करण्यास अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ नुसार बंदी घालण्यात आली असून, गुटखाविक्री करणा-यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तरीही उपनगरात सर्वत्र खुलेआम चढ्या भावाने गुटखा विक्री सुरू आहे. रावेत आणि परिसरात तर गुटखा विक्रीचा घाऊक बाजार झाला आहे. रावेत, आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, गुरुद्वारा चौक परिसरात किराणा मालाची दुकाने आणि पान टपऱ्यांवर सर्रास गुटखाविक्री सुरू आहे. विविध पोलीस ठाण्यांचे कलेक्टर समजले जाणारे काही पोलीस कर्मचारी या दुकानदारांना धमकावत त्यांच्याकडून मासिक हप्ते घेत खुलेआम गुटखा विक्रीसाठी अलिखित परवानगी देत असल्याचे अनेक व्यावसायिकांनी सांगितले. स्टेशन परिसरात टप-यांकडून जादा रक्कम आकारली जात आहे. एकूणच शहरासह उपनगरात सर्वत्र खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडूनही गुटखा विक्रीवर कारवाई होत नसल्याचे सांगितले जात आहे. या भागात विक्रीवर कोणाचेच नियंत्रण नसल्यासारखी परिस्थिती दिसत आहे. या गुटखा विक्रीमागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. मात्र जेथे कुंपणच शेत खात आहे, तेथे कारवाई करायची कोणावर व करणार कोण हे प्रश्न उपस्थित होत असून, कारवाई करणा-यांच्या खिशातच गुटख्याच्या पुड्या असल्याची परिस्थिती आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या गुटखाविक्री बंदीची सर्रास पायमल्ली होत असून, पैशासाठी नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे वास्तव पाहायला मिळत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी, तसेच अन्न व औषध प्रशासनाने कडक पावले उचलत हप्तेखोरांवर, तसेच सर्रासपणे गुटखा विक्री करणा-यांवर कारवाई करणे आवश्यक आहे.(वार्ताहर)विक्रेते व व्यापारी मोकाटगुटख्याची चोरटी विक्री करणारे विक्रेते व त्यांना माल उपलब्ध करून देणारे व्यापारी मोकाट सुटले आहेत. दुकानातून अथवा पानपट्टीतून खुलेआम गुटखा विक्री केली जात नसली, तरी नेहमीच्या ग्राहकाला त्रयस्थ ठिकाणी पाठवून किंवा बोलावून चोरून विक्री केली जाते. नवख्या ग्राहकाला संबंधित विक्रेते गुटखा मिळत नसल्याचे सांगतानाच नेहमीच्या ग्राहकांना मात्र हवा तेवढा गुटखा पुरविला जाताना दिसतो. गुटख्याच्या पुड्यांची विक्री मूळ दराच्या तिप्पट ते चौपट दराने केली जात आहे.ठोस व कडक कारवाईची गरजराज्यात गुटखा बंदी सुरूच ठेवण्याचा शासनाचा विचार स्तुत्य असला, तरी अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागासह पोलीस खात्यानेही गुटखा मिळणा-या ठिकाणांचा कसून शोध घेऊन त्यांना पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक व ठोस कारवाई करावी. असे केल्यानेच ख-या अर्थाने गुटखाबंदी होईल, असे मत सर्वसामान्य नागरिक, गृहिणी, सामाजिक, तसेच व्यसनविरोधी संघटनांनी व्यक्त केले. बंदीतही बिनधास्त विक्रीगुटखाबंदीच्या कालावधीत एखाद्या किरकोळ विक्रेत्याच्या दुकानावर धाड टाकून अन्न व औषध प्रशासन विभाग, तसेच पोलीस कारवाईचा फार्स करताना दिसून येत आहेत. कारण गेल्या वर्षभरात परिसरात कोठेही गुटख्याचा साठा सापडला नाही की विक्री करणारे सापडले नाहीत. तरीसुद्धा बाजारात मोठ्या प्रमाणावर गुटखा उपलब्ध होऊन त्यांची बिनधास्त विक्री कशी होते आहे, हा संशोधनाचा भाग झाला आहे.