शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

इंदापूरात २० लाखांच्या गुटख्यासह ३० लाखाचा मद्देमाल जप्त; एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 5:21 PM

ड्रायव्हरकडे चौकश केली असता ड्रायव्हरने सरूवातीला उडवा उडवीची उत्तरे....

इंदापूर (पुणे):इंदापूर शहरातील बाह्यवळण महामार्ग सोलापूर - पुणे हायवे रोडवर, डोंगराई सर्कल नजिक इंदापूर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान संशयित आयशर ट्रकमधील २० लाख रूपये कांमतीचा आरके कंपनीचा तंबाखू गुटखा व १० लाख रूपये किंमतीचा आयशर ट्रक  इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ट्रक चालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती इंदापूर वरिष्ठ पोलीस निरिक्षक तय्यब मुजावर यांनी दिली.

डोंगराई सर्कल येथे इंदापूर पोलिसांकडून शुक्रवारी सकाळी नाकाबंदी कारवाई सुरू होती. नाकाबंदी दरम्यान सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाणारा आयशर ट्रक (क्र. के.ए.०१, ए.एल. ९१२१) या गाडीचा पोलिसांना संशय आल्याने सदरची गाडी थांबवून ड्रायव्हरकडे चौकश केली असता ड्रायव्हरने सरूवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसांनी गाडीतील मालाची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला वरील प्रमाने २० लाख रूपये किंमतीचा आर. के. तंबाखू मिश्रीत गुटखा मिळून आला.

ट्रकमध्ये एकूण ४५ बाॅक्स, एका बाॅक्समध्ये सहा पिशव्या व एका पिशवीत ५० पाऊच असे एकूण २० लाख रूपये किंमतीचे ४५ बाॅक्स गुटखा पोलिसांनी जप्त केला असून १० लाख रूपये किंमतीचा ट्रक व ट्रक ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख व बारामती पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली इंदापूर वरिष्ठ पोलीस निरिक्षक तय्यब मुजावर, सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय लिगाडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश माने, पो. ना. सलमान खान, बापू मोहिते, विनोद काळे यांचे पथकाने केली असून पुढील तपास इंदापूर पोलिस करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरBaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारी