राहुल कलाल ल्ल पुणे तरुण पिढी व्यसनांच्या विळख्यात पडू नये म्हणून राज्यात घालण्यात आलेली गुटखा बंदी केवळ कागदावरच उरली आहे. पुण्याच्या चौकाचौकांमध्ये गुटख्याची, पान मसाल्याची खुलेआम विक्री होत आहे. गुटखाविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) मात्र याकडे डोळेझाक केली आहे. यामुळे गुटखा विक्री करणाऱ्यांचे फावले असून, गुटखा घेणाऱ्यांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. राज्यात गुटखा खाणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढल्याने आणि त्यास विरोध केला जात असल्याने कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडत राज्य सरकारने गुटखा, पानमसाला यावर बंदी घातली. ती कायम आहे. या बंदीची अंमलबजावणी करण्याचे काम अन्न व औषध प्रशासनावर सोपविण्यात आले. या बंदीमुळे राज्यातील तरुणाई व्यसनाच्या विळख्यातून सुटेल अशी आशा राज्य सरकारला होती. मात्र या बंदीची कठोर अंमलबजावणीच एफडीएकडून करण्यात येत नसल्याने गुटखा उत्पादक आणि विक्री करणाऱ्यांचे फावले आहे.पुण्यात आरएमडी, गोवा, विमल गुटखा अनेक पानटपऱ्या, हातगाड्यांवर मिळत आहेत. एवढेच नव्हे तर काही किराणामालाच्या दुकानांमध्येही गुटखा मिळत आहे. गुटख्याची पाकिटे दिसू नयेत म्हणून ती कागदांमध्ये बांधून देण्यात येत आहेत.शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयाबाहेर हातगाडी, टपऱ्यांमध्ये गुटख्याची खुलेआम विक्री होत आहे. येथील हातगाड्यांवर कागदांच्या पुड्यांमध्ये बांधलेला गोवा, आरएमडी, माणिकचंद गुटखा मिळतो. गोवा गुटखा ७ रुपयांना एक पुडी तर आरएमडी गुटख्याची एक पुडी २० रुपयांना विकली जाते. या परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त असूनही गुटखाविक्री करणारे न घाबरता मागणाऱ्यांना गुटखा पुरवत होते.नारायण पेठेतील पानटपऱ्यांमध्ये आणि गोळ्या-बिस्किट विकणाऱ्या छोट्या टपऱ्यांमध्ये गुटख्याची खुलेआम विक्री होत आहे. येथे विमल पानमसाला हा गुटखा कागदी पुडीमध्ये बांधून मिळत आहे. विमल पानमसाल्याच्या एका पुडीची किंमत १० रुपये आहे. विशेष म्हणजे, येथून हाकेच्या अंतरावरच पोलीस चौकी आहे. मात्र गुटखाविक्री करणाऱ्यांना याची भीती नसल्याचे चित्र आहे.४कर्वे रस्ता : कर्वे रस्त्यावरील पेट्रोलपंपाजवळील पानटपऱ्या आणि हातगाड्यांवर गुटख्याची विक्री होते. येथे विमल पानमसाला मोठ्या प्रमाणात विकला जातो. त्याची किंमत १० रुपये आहे. महत्त्वाचे म्हणजे, याच रस्त्यावर महाविद्यालय आहे. मात्र गुटखा विक्री करणाऱ्यांना याचा कोणताही धाक नसल्याने प्रामुख्याने तरुणांना या गुटख्यांची विक्री केली जात आहे.४डेक्कन :पीएमपीच्या डेक्कन जिमखाना बसस्थानकाच्या परिसरातील पानटपऱ्या आणि हातगाड्या आणि छोट्या टपऱ्यांमध्ये गुटखाविक्री होत आहे. येथे विमल पानमसाला कागदाच्या पुड्यांमध्ये बांधून विकला जातो. एका पुडीची किंमत १० रुपये आहे. तो घेण्यासाठी येथे मोठी गर्दी असते.ब्लॅकच्या गुटख्याची किंमतआरएमडी२० रुपयेगोवा७ रुपयेविमल१० रुपयेअशी चालते विक्रीगुटखाविक्री करणारे मागणी करणाऱ्या व्यक्तीला पाहून गुटखा द्यायचा की नाही ठरवितात. काही पानटपऱ्या, हातगाड्यांवर गुटख्याची विक्री करणारे जे नेहमी गुटखा घ्यायला येतात त्यांनाच त्याची विक्री करतात. पण जास्त नफेखोरीच्या उद्देशाने अनेक दुकानांमध्ये सर्रासपणे गुटखा दिला जातो.
कागदाच्या पुड्यातून खुलेआम गुटखाविक्री
By admin | Published: December 30, 2014 12:25 AM