मोरगाव : घटस्थापना व नवरात्री उत्सवाच्या मुहर्तावर आजपासून (७ ऑक्टोबर) हडपसर-मोरगाव पीएमटी बस सेवा सुरु केली जाणार आहे . प्रायोगिक तत्वावर बसच्या दिवसभरात पाच फेऱ्या होणार असून याबाबतचे परीपत्रक पुणे महानगर परीवहन महामंडळाने काढले आहे.
मोरगाव हे अष्टविनायकापैकी प्रथम स्थान असल्याने येथे राज्यासह परराज्यातून भाविक मयुरेश्वर दर्शनासाठी येतात. यामध्ये पुणे व मुंबई येथून येणाऱ्या भक्तांची संख्या अधिक आहे. तसेच मोरगाव हे तालुक्यातील महत्वाची बाजार पेठ असल्याने येथून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. यामुळे मोरगाव येथून बस सेवा सुरु केली जाच आहे.
याबाबत ग्रामपंचायत मोरगावच्या वतीने सरपंच निलेश केदारी यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच पुणे महानगर परीवहन मंडळाला चिंचवड देवस्थान ट्रस्टने पत्रव्यवहार करुन बससेवा सुरु करण्याची मागणी केली असल्याचे विश्वस्तांनी सांगितले. या सुरु होणाऱ्या बससेवेमुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.