-राहुल शेवाळे ,शेवाळवाडी, माजी सरपंच
-----------
गावे घेतल्याचे स्वागत करत आहोत. फक्त आमची विनंती आहे. पूर्वी समाविष्ट केलेल्या 11 गावाची आता परिस्थिती जशी झाली आहे, तशी आमची होवू नये. त्यासाठी राज्यशासनाने महापालिकेला फंड पुरवावा.
-शिवराज घुले, मांजरी, सरपंच
-----------
गाव समाविष्ट केले अतिउत्तम झाले आहे. दोन वर्षांपूर्वी जी गावे गेली त्यांच्यासारखे आमचे हाल होऊ नयेत. पुढील दोन-तीन वर्षे आहे तोच टॅक्स ठेवावा. टॅक्समध्ये वाढ करू नये. सोई-सुविधा पुरविण्यावर भर द्यावा.
- लक्ष्मण बांदल, वडाची वाडी, माजी सरपंच
----------
गावे समाविष्ट करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. हा निर्णय गावासाठी व विकासासाठी गरजेचा आहे. शहरीकऱण वाढत असल्याने हे होणे महत्त्वाचे होते. मात्र पूर्वी घेतलेल्या गावांचा विकास होणे अपेक्षित होते. तो झाला नाही. त्यामुळे गावे घेतल्यानंतर त्यांना सोई-सुविधा मिळणे तितकेच गरजेचे व महत्त्वाचे ठरणार आहे.
- गणपत दगडे, पिसोळी,माजी उपसरपंच