- नारायण बडगुजर - पिंपरी : पुणे जिल्ह्यात विधानसभेचे २१ मतदारसंघ आहेत. यातील हडपसर मतदारसंघात ऑनलाइन पद्धतीने सर्वाधिक म्हणजे २७,७०८, तर जुन्नर मतदारसंघात केवळ ११४७ मतदारांची मतदार यादीत नाव नोंदणी झाली.ऑफलाइन अर्थात थेट अर्ज भरून देण्याच्या पद्धतीत जिल्ह्यात भोसरीत सर्वाधिक म्हणजे ६६६१ मतदारांनी नावनोंदणी केली. दौंड मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजे केवळ ३४० मतदारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरून नावनोंदणी केली. लोकसभेच्या मावळ मतदारसंघात शहरातील पिंपरी आणि चिंचवड तर शिरुर मतदारसंघात भोसरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघ झोपडपट्टीबहुल आहे. त्यामुळे मागासवर्गीय मतदार येथे मोठ्या संख्येने आहेत. चिंचवड मतदारसंघ हिंजवडी आयटी पार्कला लागून आहे. त्यामुळे या मतदारसंघात आयटीयनची वास्तव्य अधिक आहे. अशीच परिस्थिती भोसरी मतदारसंघात आहे. तळवडे येथे सॉफ्टवेअर पार्क आहे. त्यामुळे या परिसरात तसेच मोशी परिसरातही आयटीयनची मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. हा परिसर भोसरी विधानसभा मतदारसंघात मोडतो. त्यामुळे या मतदारसंघातही मतदान यादीत ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते. पुण्यातील मगरपट्टा सिटी आणि परिसरात आयटी कंपन्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील कर्मचारी अर्थात आयटीयन हडपसर परिसरात मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. त्यामुळे या मतदारसंघात ऑनलाइन पद्धतीने मतदार यादीत नावनोंदणीवर येथील मतदारांनी भर दिल्याचे स्पष्ट झाले. लोकसभा निवडणुकीसाठी जानेवारीमध्ये निवडणूक आयोगातर्फे प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. तत्पूर्वी गतवर्षी ३१ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून निवडणूक आयोगाने मतदारनोंदणी केली. त्यानंतर पुन्हा ऑनलाइन व ऑफलाइन मतदार नोंदणीसाठी जनजागृती केली. त्याला नवमतदारांनी प्रतिसाद देत नोंदणी केली.
पुणे जिल्ह्यात विधानसभेचे २१ मतदारसंघ असून, त्यांची मतदार नोंदणीची आकडेवारी पुढील प्रमाणे :आॅफलाईन मतदारनोंदणी (१ जानेवारी ते ३० मार्च २०१९)जुन्नर - २३४४आंबेगाव - २६५९खेड आळंदी - ४५४९शिरुर - २१५२मावळ - २८८९चिंचवड - ६२४८पिंपरी - २७१५भोसरी - ६६६१हडपसर - ४८८४
आॅफलाईन मतदारनोंदणी (१ जानेवारी ते २५ मार्च २०१९)दौंड - ३४०इंदापूर - २९६०बारामती - ३४४७पुरंदर - २१७५भोर - ५०९२वडगाव शेरी - ४१५८शिवाजीनगर - २५१७कोथरुड - ४६३९खडकवासला - ३८९७पर्वती - ३९१३पुणे कॅन्टोन्मेंट - ३२५८कसबा पेठ - १४३४
----------------------
ऑनलाईन मतदारनोंदणी (१ ऑक्टोबर २०१८ ते ३० मार्च २०१९)जुन्नर - ११४७आंबेगाव - १४५०खेड आळंदी - २३८०शिरुर - १२३९०मावळ - २८८६चिंचवड - १९१४२पिंपरी - ३४६७भोसरी - ९२०१हडपसर - २७७०८
ऑनलाईन मतदारनोंदणी (१ ऑक्टोबर २०१८ ते २५ मार्च २०१९)दौंड - ५७३३इंदापूर - १२७०बारामती - १६४०पुरंदर - ३३०४भोर - २९४४वडगाव शेरी - १४३९९शिवाजीनगर - ३२५५कोथरुड - ९८३६खडकवासला - ९७५६पर्वती - ३७०८पुणे कॅन्टोन्मेंट - ३२८०कसबा पेठ - २६५५