भुलेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात पाऊस कमी प्रमाणात झाला; पण माळशिरस परिसरात मोठ्या प्रमाणात गारा पडल्या. सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान फक्त गाराच पडू लागल्या. हलकासा पाऊस व गाराच जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली. सध्या पुरंदर तालुक्यात कांदापिकाची काढणी सुरू आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसाचा जोर वाढल्यास कांदापिकाची खराबी होणार आहे. या पावसाने कांद्याच्या बियाणांचे (गोट) नुकसान होणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी डाळींब पिकाचे बहर धरलेले आहेत. त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. पुरंदर तालुक्यात नांगरणीची कामे सुरू आहेत. जमिनी कडक जात असल्याने नांगरणीची कामे थांबली होती. या पावसामुळे नांगरणीच्या कामाला गती येणार आहे. खळद : परिसरात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी पावसाचे प्रमाण जास्त होते. पावसाबरोवर वादळी वाऱ्यामुळे या परिसरातील पिकांचे नुकसान झाले आहे. चार वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह व वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. या वेळी पावसापेक्षा वादळी वाराच जास्त होता. यामुळे शेतक ऱ्यांची पिके झाकण्यासाठी धांदल उडाली. अनेक प्रवाशांचेही या पावसात हाल झाले. सध्या शेतात ज्वारी, हरभरा, गहू, कांदा या पिकांची काढणी, मळणीची कामे सुरू आहेत, तर अनेक ठिकाणी वैरणीच्या गंजी लावण्याची कामे सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सासवड : पिसर्वे गावाच्या परिसरात गारपीट केली. यामध्ये पावसापेक्षा गारांचे प्रमाण अधिक होते. सुमारे अर्धा तास झालेल्या या गारपिटीमुळे जमिनीवर गारांचा खच पडला होता. यामुळे परिसरातील डाळिंब, गहू, कांदा, हरभरा, गोटकांदा, आदि पिकांसह जनावरांच्या चार पिकांसह वैरणीचे नुकसान झाल्याचे पिसर्वे येथील शेतकरी संतोष सुरेश कोलते यांनी सांगितले. सध्या कांदा पिकाची काढणी सुरू आहे, अचानक गारपीट सुरु झाल्याने शेतकरी वगार्ची चांगलीच तारांबळ उडाली. उरुळी कांचन : गेल्या दोन-तीन दिवसांपासून वाढलेल्या उष्ण तापमानापासून अखेर सोमवारी नागरिकांना दिलासा मिळाला.आंब्याला मोहोर आला आहे, तर द्राक्ष पिकाच्या बागा सध्या घडांनी लगडलेल्या आहेत. त्या सर्व पिकांचे या पावसामुळे नुकसान होणार आहे. मुळातच शेतकरी दुष्काळाने पछाडलेला असताना पोटाला चिमटा घेत भविष्याची तजवीज करण्यासाठी शेतातील उभी पिके हालअपेष्टा सहन करीत जगविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असताना हे दुसरे अस्मानी संकट त्याच्यापुढे उभे राहिल्याने तो पुरता हवालदिल झाला आहे. (वार्ताहर)1भोर तालुक्याच्या पूर्व भागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भोंगवली परिसरातील गावांतील ज्वारी, हरभरा, गहू व कडबा भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर उसाच्या गाड्या शेतात अडकून पडल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. सारोळे, पांडे सावरदरे, न्हावी १५, न्हावी ३२२, पेंजळवाडी, टापरेवाडी, गुणंद, वाठार, हिंगे, भोंगवली व परिसरातील गावांत मुसळधार पाऊस सुरू झाला. यामुळे वावरात कापून ठेवलेली ज्वारी, गहू, हरभरा व कडबा भिजला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. पावसाने हातातोंडाशी आलेला घास वाया जाणार असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत.1भोर तालुक्याच्या पूर्व भागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भोंगवली परिसरातील गावांतील ज्वारी, हरभरा, गहू व कडबा भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर उसाच्या गाड्या शेतात अडकून पडल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. सारोळे, पांडे सावरदरे, न्हावी १५, न्हावी ३२२, पेंजळवाडी, टापरेवाडी, गुणंद, वाठार, हिंगे, भोंगवली व परिसरातील गावांत मुसळधार पाऊस सुरू झाला. यामुळे वावरात कापून ठेवलेली ज्वारी, गहू, हरभरा व कडबा भिजला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. पावसाने हातातोंडाशी आलेला घास वाया जाणार असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत.
पुरंदरच्या पूर्व भागात गारपीट
By admin | Published: March 01, 2016 1:26 AM