पुणे : उत्तरेकडील दाट धुक्याचा प्रभाव वाढला असल्याने पुणे ते दिल्ली विमान उड्डाणे रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही विमानांना एक तासांपर्यंत उशीर झाला असल्याने सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ही विमान प्रवाशांना फटका बसला. गेल्या दोन दिवसांपासून दाट धुके पडत आहे. त्यामुळे विमानांच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे.
दिल्लीमध्ये पहाटे पासून ते दुपारपर्यंत धुक्याचा परिणाम राहत आहे. त्यामुळे दिल्ली वरून पुणे येते येणारी वेगवेगळ्या कंपन्याची ५ विमाने धुक्क्यामुळे रद्द करण्यात आली. तर पुणे वरून दिल्ली, अमृतसर, चंडीगडकडे जाणारे ३ विमान रद्द करण्यात आली आहेत. धुक्यामुळे दोन दिवसांपासून पुणे दिल्ली आणि दिल्ली - पुणे विमानांचे वेळापत्रक बिघडल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
पुण्यातून दिल्लीसाठी सर्वाधिक विमाने धावतात. या मार्गावर वेगवेगळ्या कंपन्याच्या साधारण १५ पेक्षा जास्त विमान सेवा आहेत. पण, दोन दिवसांपासून सकाळच्या टप्प्यातील काही विमानांना उशीर होत आहे. तर, काही विमाने रद्द होत आहेत. यामध्ये दिल्ली ते पुणे वरून येणारे ५ विमाने तर पुणे ते दिल्ली कडे जाणारी ३ एकूण ८ विमाने खराब हवामानामुळेच ही विमाने रद्द झाली आहेत. त्याच बरोबर अमृतसर, चंदीगड,लखनऊ आणि हैदराबाद, गोवा,अहमदाबाद कडे जाणारी प्रत्येकी एक विमान रद्द झाले. त्यामुळे कामाच्या निमित्ताने दिल्लीला जाणाऱ्या व दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या नागरिकांच्या खूपच अडचणी झाल्या आहेत. अनेकांच्या महत्वाच्या मिटिंग व कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे मनस्ताप देखील सहन करावा लागला.