पुणे : ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’, ‘इस देश मे अगर रहना होगा, वंदे मातरम् कहना होगा’, अबू आझमी आणि वारीस पठाण यांचा निषेध असो’, अशा घोषणा देत समस्त हिंदू आघाडीतर्फे वंदे मातरम् न म्हणणाºयांचा निषेध करण्यात आला. वंदे मातरम् न म्हणणाºयांना भारतात राहण्याचा अधिकार नसून त्यांना पाकिस्तानात पाठवायला हवे, अशा संतप्त प्रतिक्रिया या वेळी कार्यकर्त्यांमधून उमटत होत्या.समस्त हिंदू आघाडीच्या कार्यकर्त्यांनी येरवडा येथील पर्णकुटी पोलीस चौकीसमोर हे निषेध आंदोलन केले. या वेळी आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे, विश्व हिंदू संघ महाराष्ट्राचे अध्यक्ष हेमेंद्र जोशी,अॅड. मोहन डोंगरे, येरवडा विभागप्रमुख बाळासाहेब विश्वासराव, आशिष वरगंटे, किसन पाटील, अशोक चव्हाण, अनिल झेंडे, स्वामी चिल्वेरी, सूरज रजपूत, संतोष गायकवाड यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.मिलिंद एकबोटे म्हणाले, ‘क्रांतिकारकांनी भारतभूमी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र करण्यासाठी ‘वंदे मातरम्’च्या घोषणा देत भारतमातेसाठी प्राणांची आहुती दिली. वंदे मातरम् न म्हणणाºयांना पाकिस्तानात पाठवायला हवे.’ आंदोलनाला सनातन संस्था व शिवप्रतिष्ठानचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.
हिंदू आघाडीतर्फे येरवड्यात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 4:44 AM