शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

‘स्वच्छंदी’चे आगळेवेगळे हळदी-कुंकू

By admin | Published: January 21, 2016 1:11 AM

‘‘ग्रामीण भागातील महिला आपली नेहमीची कामे करून स्वत:साठी खास वेळ काढून सामाजिक भान जपत स्वत:च्या इच्छेनुसार जगण्याचा प्रयत्न करीत आहेत

राजुरी : ‘‘ग्रामीण भागातील महिला आपली नेहमीची कामे करून स्वत:साठी खास वेळ काढून सामाजिक भान जपत स्वत:च्या इच्छेनुसार जगण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा एक सकारात्मक विचार आहे. महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण आणि आत्मविश्वासवृद्धी या त्रिसूत्रीचा आपण उपयोग करून आपल्यासोबत कुटुंबाचा विकास कसा साधू शकतो, आज गावागावात समाजाला दिशा देण्यासाठी स्वच्छंदी कट्ट्यांची गरज आहे,’’ असे गौरवोद्गार जुन्नरच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी राजुरी येथे काढले.नम्रता हाडवळे यांनी राजुरी येथील महिलांना एकत्रित करून स्थापन केलेल्या स्वच्छंदी कट्ट्याच्या वतीने हळदी-कुंकवाचा समारंभ आयोजिण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जुन्नरच्या विकास अधिकारी नम्रता जगताप उपस्थित होत्या. जगताप म्हणाल्या, ‘‘महिलांनी कसलाही भेदभाव न ठेवता स्वत:ला प्रगत करावे. स्वच्छंदी कट्टा ही तुमची स्वत:ची अस्मिता असून ही अस्मिता दिवसेंदिवस वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहा.’’ महिलांच्या सहभागाबद्दल तसेच नेहमीच्या संक्रांत वाणाला फाटा देऊन सामाजिक जबाबदारी जपल्याने सर्वांचेच कौतुक केले. महिलांना एकत्रित येऊन आपण काय करू शकतो, याची उदाहरणे सांगितली. स्वच्छंदी कट्ट्यासारखी संकल्पना ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात राबविली जावी आणि त्यात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.गणपती महोत्सवापासून, ग्रामीण भागातील महिलांनी स्वत:साठी व्यक्त होण्याचे व्यासपीठ म्हणून सुरू केलेला स्वच्छंदी कट्टा समाजापुढे एक वेगळाच आदर्श घेऊन आला आहे. मकरसंक्रांत हा खास महिलांचा सण, मग त्यात ठिकठिकाणी हळदी-कुंकवाचे कार्यक्रम होत असतात. महिलावर्गही मोठ्या उत्साहात या कार्यक्रमात सहभागी होत असतात. नुसत्याच सहभागी न होता, संक्रांतीचे वाण म्हणून काही भेटवस्तू एकमेकीला देण्याचाही प्रघात आहे. पण काळासोबत या कार्यक्रमाचे स्वरूप बदलत चालले आहे. संक्रांतीचे वाण म्हणून एकमेकीला दिल्या जाणाऱ्या वस्तू या बऱ्याचदा निरुपयोगी आणि निकृष्ट दर्जाच्या असतात. आपला मोठेपणा दाखविण्यासाठी अवास्तव साधनसंपत्तीचा दुरुपयोगच जास्त झाल्याचे पाहायला मिळते.’’(वार्ताहर) राजुरी येथील स्वच्छंदी कट्ट्याचा पण असाच संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकवाचा कार्यकम्र होता, कट्ट्यावरील नेहमीच्या महिला तर होत्याच, पण त्यांनी परिसरातील इतरही महिलांना बोलावले होते. आपल्या आजूबाजूला काही घटक प्राथमिक प्रतिकूल परिस्थितीत जगत असताना आपण मात्र त्या गावचेच नाही, असं वागणं स्वच्छंदी कट्ट्याच्या महिलांना खटकत होते. सामाजिक आत्मभान जपत स्वछंदी कट्ट्याच्या महिलांनी परिसरातील महिलांना हळदी-कुंकवाला बोलाविले, एकमेकीला तिळगूळ दिला. भेट म्हणून एक एक छोटेसे फुल दिले. संक्रांतीच्या वाणाचे पैसे एकत्र करून ते जुन्नरमधील मावळ भागातील प्राथमिक शाळेतील गरीब मुलांना वही व पेन्सिलसाठी द्यायचे असे एकमताने ठरले.