यावेळी भाजप जिल्हा किसान मोर्चा सरचिटणीस माऊली शेळके म्हणाले की, वीजबिल थकल्यावरून महावितरणने ७५ लाख शेतकऱ्यांना वीज कनेक्शन कट करण्याची नोटीस पाठवली आहे. यामुळे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना अंधारात ठेवून वीज बिल तोडण्याची आडमूठी भूमिका महावितरणने घेतली आहे. भविष्यात कोणाला ट्रान्सफर पाहिजे असेल तर त्याने वीज बिल प्रथम भरावे, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी शासन शेतकरी विरोधी आहे. जनतेसमोर या शासनाचा खरा चेहरा आला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी गणेश आखाडे, दशरथ गरदडे, संजय काळभोर, किरण काळे, श्रीकांत गुंड, किरण देशमुख, दिनेश गडदे, आबा चोरमले, गणेश शेळके संभाजी थोरात आदी उपस्थित होते.
०५ केडगाव
केडगाव येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना माऊली ताकवणे व इतर.