कांदळी वडगाव - येथील वाणेवाडी, नगदवाडी कांदळी, हिवरेतर्फे नारायणगाव वनहद्दीत येणाऱ्या नारायणगड परिसरात आदिवासी समाजातील लोकांनी केलेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम गुरुवारी सकाळपासून वनविभाग, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या हाती घेतली. या कारवाईत एकूण ६३ कुटुंबांच्या झोपड्या हटविण्यात आल्या. उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर, आंबेगाव आणि खेड येथील १५० हून अधिक वनसंरक्षकांनी ही कारवाई केली.नारायणगड परिसरातील वनविभागाच्या जागेवर काही आदिवासी नागरिकांनी झोपड्या बांधून अतिक्रमण केले होते. हे अतिक्रमण हटविण्यासंदर्भात वनविभागाने यासंदर्भात या समाजाच्या लोकांना वेळोवेळी जाहीर नोटिसा देऊन सुचित केले होते. परंतु; त्यांनी त्याला प्रतिसाद न दिल्याने जुन्नर येथील वनविभागाचे अधिकारी उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर, आंबेगाव आणि खेड येथील १५० हून अधिक वनसंरक्षकांनी धडक कार्यवाही केली. या मोहिमेत आदिवासी समाजाच्या एकूण ६३ कुटुंबांच्या झोपड्या पाडण्यात आल्या. परंतु; यावेळी आदिवासी समाजाची लोकं त्याठिकाणी उपस्थित नव्हती. या कार्यवाही दरम्यान जुन्नरचेतहसीलदार किरण काकडे, जुन्नरचे पोलीस उपाधीक्षक राम पठारे, नारायणगाव सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड कार्यवाही दरम्यान उपस्थित होते.वनविभागाच्या जागेवर मागील वर्षी लोकशासन आंदोलकानी अतिक्रमण केले होते. त्यावेळी देखील अशाच पद्धतीने वनविभागाने कार्यवाही केलेली होती. परंतु, त्यावेळी कार्यवाहीला हिंसक वळण लगले होते. त्यामुळे प्रशासनाने अगोदरच काळजी घेत या समाजातील विध्वंसक प्रवृत्तीच्या १३ लोकांना दि.१३ जून रोजी हिवरेतर्फे नारायणगाव येथून अटक करून त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.भोळ्या लोकांना दिला जातोय चुकीचा सल्ला1या आदिवासी समाजातील लोकांना अतिक्रमण करा, असा सल्ला दिला जातो. तुम्ही वर्षानुवर्षे त्याठिकाणी राहिलात तर तुम्हाला ती जमीन मिळेल, अशी चुकीची माहिती पुरविली जाते.2यामुळे हा समाज वारंवार अतिक्रमण करतो, अशी प्रतिक्रिया जुन्नरचे वनविभागाचे अधिकारी उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे यांनी दिली. परंतु, अशा चुकीच्या पद्धतीने केलेल्या अतिक्रमण कायद्याच्या विरोधात आहे आणि अशा जबरदस्तीने केलेल्या हस्तगत केलेल्या जमिनी शासन कुणालाही देत नाही, असेही ते यावेळी म्हणाले व अशा प्रवृत्तीच्या लोकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याकडे मागेपुढे पाहणार नाही, अशी तंबी यावेळी दिली.
वनजमिनीवरील अतिक्रमणांवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 3:02 AM