चाकण : चाकण शहरातील माणिक चौक ते मार्केटयार्ड दरम्यानच्या रस्त्यागलत व आंबेठाण चौक, तळेगाव चौकांमध्ये हातगाड्या, पथारीवाले, विक्रेत्यांचे स्टाॅल तसेच दुकानासमोरील मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून व्यवसाय सुरु केल्याने सतत वाहतूक कोंडी होत होती. ही अतिक्रमणे नगरपालीकेने शुक्रवारी हटवल्याने चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे.
चाकण शहरातील माणिक चौक, तळेगाव चौक, आंबेठाण चौकांमध्ये तसेच जुना पुणे नाशिक रस्त्याच्या दुतर्फा पथारीवाले, हातगाडीवाले व्यवसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमणे करून दुकाने थाटली होती. यामुळे सतत वाहतूक कोंडी होत होती. यामुळे चाकण नगरपरिषद, नाणेकरवाडी ग्रामपंचायत, चाकण पोलीस व वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई करून वाहतुकीला अडथळा ठरणारी दुकाने शुक्रवारी हटवली. यामुळे चौकांनी काही दिवस का होईना मोकळा श्वास घेतला आहे.
माणिक चौक ते मार्केटयार्ड दरम्यानच्या जुन्या पुणे नाशिक रस्त्याच्या दुतर्फा मोठी बाजारपेठ आहे. चक्रेश्वर मंदिर, चाकणचा भुईकोट किल्ल्याकडे जाणारे रस्ते आहेत. जिल्हा परिषद शाळा असून या शाळेसमोरच अनेक छोट्या व्यापाऱ्यांनी रस्त्यालगतच दुकाने उभी केल्याने रस्ते अरूंद झाल्याने वारंवार वाहतूक कोंडी होऊन, लहान शाळकरी मुले, वृद्ध व आजारी लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.
फोटो - चाकण येथे रस्त्यावरील अतिक्रमण हटवताना पोलीस अधिकारी. करून दुकाने उभी करण्यात आली आहे.