वरवंड : वरवंड- हातवळण -कडेठाण रस्त्याचे काम होऊन अवघ्या दोन वर्षात कामाची वाट लागली आहे. रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. कामामुळे आलेला निधी पाण्यात जातो की काय? अशी चिंता हातवळण ग्रामस्थांना सातावत आहे.
या कामाबाबत दोन वर्षांपूर्वी या रस्त्याबाबत ग्रामसभेत विषय निघाला आणि ग्रामसभेने त्या कामावर आक्षेप घेत त्या ठेकेदारांच्या निकृष्ट कामाबाबत ठराव करण्यात आला होता. याबाबत दैनिक ‘लोकमत’मध्ये 18 डिसेंबर 2019 रोजी बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती, त्यानंतर त्या ठेकेदाराने काम केले. मात्र हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे हे काम अवघ्या दोन वर्षांत खराब झाल्यामुळे या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या निकृष्ट कामाबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. या निकृष्ट कामाबद्दल ग्रामस्थ नाराज असून त्याच्या विरोधात सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे तक्रार करणार आली होती, मात्र हे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.
--
तक्रार करून नाही उपयोग
माजी कृषी उत्पन्न बाजार समिती मा. सभापती सागर फडके म्हणाले की, सदर काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. कामाबाबत अधिकारी वर्गाला
तक्रार करूनही काही फरक पडत नसल्यामुळे याबाबत जिल्हाधिकारी, पुणे यांना याबाबत तक्रार करणार असून या कामाची व संबंधित अधिकारी यांची चौकशी करण्याची मागणी करणार आहे असे फडके यांनी सांगितले आहे.
---
फोटो ओळ-हातवळण-कडेठाण रस्ता अवघ्या दोन वर्षांच्या आत उखडलेला दिसत आहे.