शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

अपंग योजना अडकल्या शासनाच्या लाल फितीत

By admin | Published: March 16, 2016 8:39 AM

अपंगांना अपंगत्व हे शाप न वाटता, वरदान वाटले पाहिजे, या दृष्टिकोनातून शासनातर्फे त्यांच्या कल्याण आणि विकासासाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.

- प्रज्ञा केळकर-सिंग,  पुणेअपंगांना अपंगत्व हे शाप न वाटता, वरदान वाटले पाहिजे, या दृष्टिकोनातून शासनातर्फे त्यांच्या कल्याण आणि विकासासाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, यंत्रणेतील उदासीनता, प्रभावी अंमलबजावणीचा अभाव, गोंधळलेले नियोजन यामुळे या योजना लाल फितीच्या कारभारात अडकल्या आहेत. शालांत परीक्षा पूर्व तसेच शालांत परीक्षोत्तर शिक्षणासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय, तसेच विविध विभागांमार्फत शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. विशेष व्यक्ती सुप्त सामर्थ्य ओळखून त्याला प्रोत्साहन देणारी ही योजना आहे. मात्र, या शिष्यवृत्ती योजना केवळ कागदावरच राहिल्या आहेत. १००० हून अधिक विद्यार्थी या योजनेपासून वंचित आहेत. बीजभांडवल योजनेंतर्गत १८ ते ५० वयोगटातील दृष्टिहीन, कर्णबधिर, अस्थिविकलांग अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी, स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जरुपाने अर्थसहाय्य दिले जाते.या योजनेसाठी २०१५-२०१६ या वर्षात पुणे जिल्ह्यातून ६६ अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी जिल्हा परिषदेतर्फे ५९ अर्ज बँकांकडे पाठवण्यात आले. या योजनेसाठी १२ लाख रुपयांची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली होती. शालांत परीक्षा पूर्व शिष्यवृत्ती योजनाएकूण अर्जसंख्या३६८२निधीची मागणी४० लाख रुपयेप्राप्त निधी१६, ४०, ०००लाभार्थी विद्यार्थी९१७वंचित विद्यार्थी२७६५शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजनाएकूण अर्जसंख्या१२०९निधीची मागणी४ कोटी ८ हजार रुपयेप्राप्त निधी४२, ८४, ०००लाभार्थी विद्यार्थी१२८वंचित विद्यार्थी१०८१अपंग व्यक्तींसाठी शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांची, शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश अपंग कल्याण आयुक्तालयातर्फे सर्व संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. जिल्हा समाजकल्याण अधिकारी अथवा आरक्षणाच्याबाबतीत प्रशासकीय विभागांचे नियुक्त अधिकारी यांनी त्याची जिल्हा पातळीवर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. अपंगांकडून आयुक्तालयाकडे आलेल्या तक्रारींची वेळोवेळी दखल घेतली जाते. - नितीन ढगे, उपायुक्त, अपंग कल्याण आयुक्तालयमी सहा-सात महिन्यांपूर्वी अपंग व्यक्तींसाठी असलेल्या विवाह अर्थसहाय्य योजनेसाठी अर्ज केला होता. समाजकल्याण विभागाकडे सर्व कागदपत्रांची पूर्तताही केली. मात्र, अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.- सुहास माळीबीजभांडवल योजनेतून व्यवसायासाठी कर्ज मिळावे, यासाठी मी २०१४ मध्ये अर्ज केला होता. दोन वर्षांमध्ये अनेकदा प्रक्रियेसाठी विचारणा केली. एक-दोन दिवसांमध्ये हे अर्थसहाय्य खात्यात जमा होईल, असे सांगण्यात आले आहे. - उमेश जगतापअपंग व्यक्तींना मुख्य प्रवाहात सामील करून घेता यावे, यासाठी शासनातर्फे विविध योजना राबवल्या जातात. मात्र, केवळ कागदोपत्री नवीन योजना राबविण्यापेक्षा याआधीच्या योजनांचे योग्य नियोजन केल्यास लाभार्थींना त्याचा फायदा होऊ शकतो.- हरदास शिंदे, संयुक्त अपंग हक्क सुरक्षा समिती